पिंपरी-चिंचवड (पुणे) - कोरोनाशी मुकाबला करण्यात राज्य सरकार अपयशी ठरत आहे, असे आरोप करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेने राबवलेल्या उपाययोजनामुळे पालिकेला बरेच यश आल्याचे म्हटले आहे. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात कोरोनाशी कसा मुकाबला केला जातो आहे, याची माहिती घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस आज (मंगळवार) पिंपरी-चिंचवडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांसोबत बोलताना राज्यात लॉकाडऊन पुन्हा सुरू करता येईल, असे वाटत नसल्याचे म्हटले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पातळीवर राबवण्यात येत असलेल्या उपाययोजना, डॅशबोर्डद्वारे चांगले कार्य सुरू आहेत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तर पावसाळ्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढणार असल्याने त्या अनुषंगाने पावले उचलणे गरजेचे आहे. लॉकडाऊन पुन्हा सुरू करणे हा पर्याय नसल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.