पुणे -पुण्यातील देशना नहार हिने वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी 'लिंबो स्केटिंग' ( sport limbo skating) या अत्यंत अवघड 'स्केटिंग' स्पर्धेत ( limbo 'skating' competition ) गीनीज बुकात नाव नोंदवले आहे. लिंबो स्केटिंग या प्रकारामध्ये केवळ १३.७४ सेकंदांची तीने वेळ नोंदवत जागतीक रेकॉर्ड केला आहे. यात तीने २० चारचाकी गाड्यांखालून ( Skating under four-wheelers ) स्केटिंग पूर्ण करीत गीनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ( Guinness Book of World Records ) आपले नाव कोरले आहे.
Deshana Nahar World Record : देशना नाहरची गिनिज बुकात नोंद, १३.७४ सेकंदांची वेळ नोंदवत केला जागतिक रेकॉर्ड - देशना नहार जागतिक विक्रम गिनीज बुक रेकॉर्ड
पुण्यातील देशना नहार हिने वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी 'लिंबो स्केटिंग' ( sport limbo skating) या अत्यंत अवघड 'स्केटिंग' स्पर्धेत ( limbo 'skating' competition ) गिनीज बुकात नाव नोंदवले आहे. लिंबो स्केटिंग या प्रकारामध्ये केवळ १३.७४ सेकंदांची तीने वेळ नोंदवत जागतीक रेकॉर्ड केला आहे. यात तीने २० चारचाकी गाड्यांखालून ( Skating under four-wheelers ) स्केटिंग पूर्ण करीत गीनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ( Guinness Book of World Records ) आपले नाव कोरले आहे.
१३.७४ सेकंदांमध्ये २० चारचाकी गाड्यांखालून स्केटिंग -या चिमुकल्या तरबेज खेळाडूला पुणे येथील प्रशिक्षक विजय मलजी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. देशना ही पुणे येथील हचींग स्कुल मध्ये इयत्ता तिसरी मध्ये शिक्षण घेत आहे. तिच्या या नव्या कर्तृत्वासाठी तिची आजी दया नाहर यांनीही अथक परिश्रम घेतले आहे. या कामगिरीसाठी तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. देशनाला वयाच्या पाचव्या वर्षापासून स्केटिंगची आवड निर्माण झाली. तिने गेली दोन वर्ष रॉक ऑन व्हील्स स्केटिंग अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. या स्पर्धांचा अनुभव पाठीशी घेऊन तिने जागतिक विक्रम करत राज्यातील प्रत्येकाची मान अभिमानाने उंचावली आहे.
आम्हला खूप आनंद झाला -गेली दोन वर्षे देशना मनापासून मेहनत घेत स्केटिंग शिकत आहे. तिच्या आजीने तिच्यासाठी विशेष मेहनत घेतली. तिने जो वर्ड रेकॉर्ड केला आहे याचा आम्हा सर्वांना आनंद आहे असे, देशनाचे वडील आदित्य नहार यांनी म्हटले आहे.