महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुन्हा साधली पहाटेची वेळ.. अजित पवारांच्या पाहणी दौऱ्याने मेट्रोच्या अधिकाऱ्यांची तारांबळ - अजित पवार पुणे स्टेशन मेट्रो

आज पहाटेच अजित पवारांनी पुणे स्टेशन येथील मेट्रोच्या कामाची पाहणी केली. कोरोना काळात मेट्रोचे काम बंद होते. आता काम सुरू असले, तरी कामगार संख्या कमी आहे. त्यामुळे अनलॉकमध्ये मेट्रोचे काम कसे सुरू आहे, मेट्रोची स्थानके कशी असतील तसेच पुणे मेट्रोसाठी सर्व जागा संपादित आहे का अशा गोष्टींचा त्यांनी यावेळी आढावा घेतला.

Deputy CM Ajit Pawar visits Pune Station metro office early Friday
अजित पवारांनी केली मेट्रोच्या कामाची पाहणी; पहाटेच भेट दिल्याने अधिकाऱ्यांची तारांबळ

By

Published : Sep 25, 2020, 7:19 AM IST

Updated : Sep 25, 2020, 10:01 AM IST

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुन्हा पहाटेच पुण्यातील मेट्रोच्या कामाची पाहणी केली. ५.४५च्या सुमारास त्यांनी पुणे स्टेशन येथील मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला.

कोरोना काळात मेट्रोचे काम बंद होते. आता काम सुरू असले, तरी कामगार संख्या कमी आहे. त्यामुळे अनलॉकमध्ये मेट्रोचे काम कसे सुरू आहे, मेट्रोची स्थानके कशी असतील तसेच पुणे मेट्रोसाठी सर्व जागा संपादित आहे का? अशा गोष्टींची पाहणी केली. अजित पवार यांनी पहाटेच यासाठी भेट दिल्याने अधिकाऱ्यांची मात्र तारांबळ उडालेली पहायला मिळाली.

पुन्हा साधली पहाटेची वेळ.. अजित पवारांच्या पाहणी दौऱ्याने मेट्रोच्या अधिकाऱ्यांची तारांबळ

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पहाटे सहा वाजता पुणे स्टेशन येथे जावून प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. मेट्रोचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यंत्रणेला दिल्या. पवारांनी आज पुणे स्टेशन, व्हील पार्क डेपो (वनाज), शिवाजीनगर कृषी महाविद्यालय येथे पाहणी करून मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी मेट्रोच्या सुरू असलेल्या कामाबाबत सविस्तर माहिती दिली.

पुन्हा साधली पहाटेची वेळ.. अजित पवारांच्या पाहणी दौऱ्याने मेट्रोच्या अधिकाऱ्यांची तारांबळ
पुन्हा साधली पहाटेची वेळ.. अजित पवारांच्या पाहणी दौऱ्याने मेट्रोच्या अधिकाऱ्यांची तारांबळ

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवाजीनगर येथे मॉडेल ट्रेनने प्रवास केला. शिवाजीनगर येथे बोगदा काम, व्हील पार्क येथील कचरा डेपोचे अत्याधुनिक मेट्रो डेपोमध्ये रूपांतर करण्यात आले आहे, येथील कामाचीही उपमुख्यमंत्री पवार यांनी पाहणी केली. मेट्रोच्या रेणू गेरा यांनी या मेट्रो डेपो उभारणीबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यापूर्वी शुक्रवारी उपमुख्यमंत्र्यांनी पहाटेच पिंपरी चिंचवडमधील मेट्रोच्या कामाची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी मेट्रो मुख्याधिकारी ब्रिजेश दीक्षित यांच्या समवेत काही अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये संत तुकाराम नगर ते पिंपरी (खराळवाडी) असा प्रवास केला होता.

आज यानंतर अजित पवार पुण्यातील विधान भवन येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची कोरोना आढावा बैठक घेणार आहेत.

Last Updated : Sep 25, 2020, 10:01 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details