महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Devendra Fadnavis on Cabinet Expansion : मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, सरकारही मजबूत आहे- फडणवीस - Swatantryacha amrut mahotsav

Devendra Fadnavis on Cabinet Expansion : शिंदे- फडणवीस सरकारच्या 18 कॅबीनेट मंत्रीपदांची शपथविधी पार पडला. शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले तरी मंत्रिमंडळ विस्तार होत नाही, म्हणून काही लोक बोलत होते. विस्तार झाला तर सरकार पडेल असे काही लोक म्हणत होते. आता विस्तार झाला सरकारही मजबूत आहे. काहीही प्रश्न उपस्थितीत झाला नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाकडून होणाऱ्या टीकेला उत्तर दिले

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By

Published : Aug 10, 2022, 6:42 AM IST

पुणे - शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले तरी मंत्रिमंडळ विस्तार होत नाही, म्हणून काही लोक बोलत होते. विस्तार झाला तर सरकार पडेल असे काही लोक म्हणत होते. आता विस्तार झाला सरकारही मजबूत आहे. काहीही प्रश्न उपस्थितीत झाला नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाकडून होणाऱ्या टीकेला उत्तर दिले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला मंत्री नाही हा आरोप लवकरच दूर होईल -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमानिमित्त आलेले असताना फडणवीस यांनी कार्यक्रमापूर्वी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. मंत्रिमंडळात महिला मंत्री नसल्याच्या आरोपांबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले, महिला मंत्री नाही हा आरोप लवकरच दूर होईल. महिलांना योग्य प्रतिनिधित्व आमच्या मंत्री मंडळात मिळेल. आधीच्या सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार केला. त्यावेळी त्यांच्याकडे पण महिला मंत्री नव्हत्या. त्यामुळे त्यांना हे बोलायचा काही अधिकार नाही, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

पहिल्यांदा त्यांनी आरसा पाहावं आणि त्यानंतर ट्विट करावे -ज्या पक्षाचे दोन मंत्री आरोपाखाली जेलमध्ये असतील आणि अनेक नेत्यांवर त्या ठिकाणी खटले सुरू असतील, अशा पक्षाने अशा प्रकारचे यादी टाकण्याचा त्यांना नैतिक अधिकार आहे का ? असा प्रश्न पहिल्यांदा त्यांनी आरसा पाहावं आणि त्यानंतर ट्विट करावे, असा टोला त्यांनी विद्या चव्हाण यांना लगावला आहे. संजय राठोड यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे, असे सांगत फडणवीसांनी अधिक बोलणं टाळले.

18 आमदारांचा शपथविधी, आरोप-प्रत्यारोप -भाजपा व शिंदे गटाचे ( BJP and Shinde group ) प्रत्येकी 9 अशा एकूण 18 आमदारांना मंत्रिपदाची ( 18 MLAs sworn as ministers ) संधी मिळाली आहे. यात एकही महिलेला संधी मिळालेली नाही, तर वादग्रस्त अब्दुल सत्तार आणि संजय राठोडांची या नव्या मंत्रीमंडळात वर्णी लागली आहे.

हेही वाचा -Maharashtra Cabinet Expansion : 18 आमदारांचा शपथविधी, आरोप-प्रत्यारोप...; 'असा' राहिला मंत्रिमंडळ विस्ताराचा दिवस

हेही वाचा -Cabinet Expansion: सरकार आता गतीने काम करणार- सुधीर मुनगंटीवार

ABOUT THE AUTHOR

...view details