महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'तो' दगड राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी मारला हे कशावरून? - अजित पवार - पडळकर दगडफेक प्रकरण

गोपीचंद पडळकर आमचे विरोधक आहेत. त्यामुळे ते आमच्यावर आरोप करणारच. त्यांच्या गाडीवर मारलेला दगड राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीच मारला हे कशावरून ? अनेकदा सहानुभूती मिळवण्यासाठी बरेच जण स्वतःच नुकसान करत असतात. यापूर्वी देखील अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. असेही पवार म्हणाले.

अजित पवार
अजित पवार

By

Published : Jul 2, 2021, 5:58 PM IST

पुणे - विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर बुधवारी सोलापुरात दगडफेक करण्यात आली होती. त्यानंतर गाडीवर दगडफेक करणारा तरुण हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असल्याचा आरोप पडळकर यांनी केला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले, गोपीचंद पडळकर आमचे विरोधक आहेत. त्यामुळे ते आमच्यावर आरोप करणारच. त्यांच्या गाडीवर मारलेला दगड राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीच मारला हे कशावरून ? अनेकदा सहानुभूती मिळवण्यासाठी बरेच जण स्वतःच नुकसान करत असतात. यापूर्वी देखील अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. असेही पवार म्हणाले. विचारांची लढाई विचारांनीच लढावी या मताचा मी असल्याचेही त्यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?

गोपीचंद पडळकर यांनी बहुजन संवाद दौऱ्यादरम्यान सोलापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली होती. 'शरद पवार हे साडेतीन जिल्ह्याचे स्वामी आहेत, ते मोठे नेते आहेत असे मी मानत नाही', असा टोला पडळकर यांनी लगावला होता. पडळकर यांनी केलेल्या टीकेनंतर त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती. या घटनेनंतर सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर देखील दगडफेक करण्यात आली होती. दगडफेक करणारे त्यांचेच कार्यकर्ते असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा -भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या वाहनावर दगडफेक

ABOUT THE AUTHOR

...view details