महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्रींना उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून आदरांजली - लालबहादूर शास्त्री जयंती

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही महापुरुषांच्या स्मृतींना अभिवादन केले.

ajit pawar on mahatma gandhi birth anniversary
अजित पवार पुणे स्टेशनवर दाखल...राष्ट्रपिता गांधी आणि लालबहादूर शास्त्रींना अभिवादन!

By

Published : Oct 2, 2020, 9:03 AM IST

Updated : Oct 2, 2020, 10:41 AM IST

पुणे - राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही महापुरुषांच्या स्मृतींना अभिवादन केले. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांनी आज सकाळी सात वाजता पुणे रेल्वेस्टेशन परिसरातील राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

अजित पवार पुणे स्टेशनवर दाखल...राष्ट्रपिता गांधी आणि लालबहादूर शास्त्रींना अभिवादन!

पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनीही महात्मा गांधींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्रशासनातील अधिकारी, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यांनीही महात्मा गांधींच्या पुतळ्यास अभिवादन केले

महात्मा गांधींनी सत्य, अहिंसा, शांततेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी 'जय जवान, जय किसान'ची घोषणा देऊन या देशातील सैनिकांना आणि शेतकऱ्यांना सन्मान मिळवून दिला. या दोन महान नेत्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील आणि राष्ट्र उभारणीतील कार्याचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली आहे, असे पवार म्हणाले.

Last Updated : Oct 2, 2020, 10:41 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details