पुणे -टाळ मृदुगांचा गजर आणि ज्ञानोबा माऊलींचा जयघोष करत जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार,आमदार रोहित पवार, आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांची पूजा झाली.
Pandharpur Wari 2022 : जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान - संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांची पूजा
टाळ मृदुगांचा गजर आणि ज्ञानोबा माऊलींचा जयघोष ( Gyanoba Mauli cheers) करत जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान ( Departure of Palkhi Pandharpur) झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar ) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार,आमदार रोहित पवार, आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांची पूजा झाली.
काराम महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
अखंड महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहतो. तो क्षण म्हणजे आषाढी वारीचा पायी सोहळा. अन् अखेर हा क्षण आला आहे. जगदगुरु संत तुकाराम महाराजांची पालखीच देहूनगरीतुन प्रस्थान झाले. या पालखीचे हे यंदाचे हे 337 वे वर्ष आहे. गेली दोन वर्ष कोरोनामुळे वारकरी संप्रदाय या सोहळ्याला मुकला होता. यंदा कोरोना ओसरल्याने पायी वारी होते आहे. वारकरी मोठ्या संख्येने हे देहूत दाखल झाले आहे.