पुणे- शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आर्थिक मंदी, बेरोजगारी महागाई, शेतकरी आत्महत्या, आरोग्य आणि विद्यार्थ्यांच्या समस्या या प्रश्नांवर निदर्शने करण्यात आली. यावेळी निदर्शकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सरकारच्या विरोधात फलक झळकावत सरकारचा निषेध केला.
पुणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारविरोधात निदर्शने - pune collector office
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर आर्थिक मंदी, बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, आरोग्य आणि विद्यार्थ्यांच्या समस्या या प्रश्नांवर जिल्हा काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला.
pune district congress
केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्यात आणि देशात मंदी आहे. या मंदीमुळे राज्यात गुन्हेगारी वाढत असल्याचा आरोप काँग्रेस निदर्शकांनी केला. पुणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वेगवेगळ्या शाखांचा वतीने ही निदर्शने करण्यात आली. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाईची समस्या भेडसावत आहे. त्याचबरोबर शेतमालाला दर नसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्याही होत असल्याचा आरोप निदर्शकांनी केला आहे.
TAGGED:
pune collector office