पुणे -राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट सुरु झाली आहे. यामुळे महाराष्ट्रातील नव्याने निवडून आलेल्या विधानसभा सदस्यांना कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा सुविधा देऊ नयेत, अशी मागणी करण्यात आली आहे. ही मागणी सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गव्हाणे यांनी राज्यपालांना पत्र पाठवून केली आहे.
नव्याने निवडून आलेल्या आमदारांना वेतन अथवा सुविधा देऊ नयेत, राज्यपालांकडे मागणी - News of the Governor of Maharashtra
राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट सुरू झाली आहे. त्यामुळे कोणत्याही विधानसभा सदस्याला कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा सुविधा देऊ नयेत अशी मागणी सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गव्हाणे यांनी राज्यपालांकडे केली आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्यानंतर सत्तास्थापनेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सध्या राज्यात अतिवृष्टीमुळे भीषण ओला दुष्काळ असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकार स्थापन होणे गरजेचे होते. मात्र, अनेक दिवसांपासून सुरु असलेला सत्ता स्थापनेचा तिढा काही केल्या सुटला नसल्यामुळे नुकतीच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.
राष्ट्रपती राजवट सुरु झाल्यामुळे महाराष्ट्रातील कोणत्याही विधानसभा सदस्याला कोणतेही काम करता येणार नाही. या मुळे सरकार स्थापन होईपर्यंत कोणत्याही विधानसभा सदस्याला कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा सुविधा देऊ नयेत, अशी मागणी करण्यात आली आहे. ही मागणी सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण बाळासाहेब गव्हाणे यांनी राज्यपालांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.