पुणे -गणेश उत्सव अधिक लोकाभिमुख व्हावा आणि मंडळांचा आणि प्रशासनाचा वेळ वाचावा यासाठी दरवर्षीच्या घ्याव्या लागणाऱ्या परवानगी आहेत, त्या पाच वर्षासाठी एकदाच द्या, अशी मागणी गणेश मंडळाचे जय गणेश व्यासपीठ यांच्यामार्फत प्रशासनाला करण्यात आली आहे. पुण्याची सांस्कृतिक ओळख असलेला गणेशोत्सव हा जगभरामध्ये पोहोचला. तो गणेश मंडळामुळे ( Ganesh Mandal Pune ) आणि त्याच गणेश मंडळांनी पाच वर्षाच्या परवानगी एकदाच आम्हाला द्या, जेणेकरून गणेशोत्सव आणखी जास्त जल्लोषात मंडळाला करता येईल, अशी मागणी केली आहे.
Ganesh Mandal Pune : सार्वजनिक गणेश मंडळांना 5 वर्षाची एकदाच परवानगी द्या; पुण्यातील मंडळांची मागणी
गणेश उत्सवाला पाच वर्षासाठी एकदाच द्या, अशी मागणी जय गणेश व्यासपीठ यांच्यामार्फत प्रशासनाला करण्यात आली आहे. पुण्याची सांस्कृतिक ओळख असलेला गणेशोत्सव हा जगभरामध्ये पोहोचला. तो गणेश मंडळामुळे ( Ganesh Mandal Pune ) आणि त्याच गणेश मंडळांनी पाच वर्षाच्या परवानगी एकदाच आम्हाला द्या, जेणेकरून गणेशोत्सव आणखी जास्त जल्लोषात मंडळाला करता येईल, अशी मागणी केली आहे.
'...म्हणून परवानगी द्या' :तीच जागा असेल तेवढाच एरिया असेल तोच मंडप असेल आणि त्या सगळ्या परवानगी लागणार असतील तर त्या पाच वर्षासाठी द्यावा. जेणेकरून यातून कार्यकर्त्याचा आणि मंडळाचाही वेळ वाचेल आणि प्रशासनाला जनतेची सेवा करण्यासाठी जास्त वेळ मिळेल. त्याच्यामुळे हा एक लोकाभिमुख निर्णय होण्यासाठी ही मागणी केली असल्याचे दगडूशेठ हलवाई गणपतीचे अध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी सांगितले आहे. भाऊ रंगारी गणेश मंडळाचे परेश खांडगे यांनी या परवानगी घेण्यासाठी जवळपास दहा ते पंधरा दिवस लागतात. दरवर्षी कार्यकर्ते नवीन असतात त्या सगळ्या गोष्टी परत समजावून सांगणे आणि त्या परत करणे याच्यासाठी वेळ जातो. त्यामुळे आम्ही सर्व गणेश मंडळाने एकत्र येऊन या मागणीचा विचार प्रशासनाने करावा यासाठी त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. प्रशासन त्याला सकारात्मक प्रतिसाद देईल, अशी सर्व गणेश मंडळांना अपेक्षा आहे. यातून गणेश उत्सव अधिक जल्लोषात आणि उत्साहात आणि लोकाभिमुख करता येईल, असे म्हटले आहे.