पुणे - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सकाळी आपल्या ट्विटरवरून एक मेसेज ट्विट केला होता. त्यानंतर काही वेळाने ते ट्विट डिलीट करण्यात आले होते. वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं म्हणून ते ट्विट डिलीट केले, असे उत्तर अजित पवार यांनी आज पुण्यात दिले. जनसंघाचे नेते पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करणारे ते ट्विट होते.
भाजपाला शह देऊन सत्ता स्थापन केलेले राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे, विरोधी पक्षाच्या मातृसस्थेच्या उभारणीत महत्त्वाचे नेते असलेल्या पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीला आठवणीने ट्विट करून त्यांचे स्मरण करतात, ही बाब अनेकांच्या भुवया उंचावणारी होती. त्यानंतर काही वेळाने हे ट्विट डिलीट केले होते. त्यामुळे या ट्विटची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.