पुणे -आज भारत हा जगातील सर्वाधिक वेगवान प्रगतिशील देश म्हणून अर्थव्यवस्थेत उभा आहे ही काही छोटी गोष्ट नाही. भारत स्वतंत्र झाला परंतू भारतातील गरिब स्थिती सुधारली नाही आणि म्हणूनच 2022 पर्यंत सर्वांना घर देण्याचा, तसेच प्रत्येक घरात शौचालय, पाणी या मूलभूत सुविधा देण्यावर आमचा कल आहे. भाजपा पक्ष ( BJP party ) हे सरकार बनविण्यासाठी राजकारण करत नाही, तर देश बनवण्यासाठी राजकारण करत आहे. असे विधान देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ( Defense Minister Rajnath Singh ) यांनी केले आहे. ते पुण्यात विद्यापीठ दीक्षांत समारंभात ( University Convocation Ceremony Pune ) बोलत होते.
या पुढे शहरात गावात असे एक घर नाही राहणार जिथे पाणी नाही, असा आमचा संकल्प आहे, असेही सिंह म्हणाले. आज भारतात 35 करोड बँक खाती आम्ही जनधन योजनेचे अंतर्गत यशस्वीपणे सुरू केली आणि जेव्हा त्या खात्यामध्ये 100 रुपये दिल्लीतून जात असतील तर तेवढेच पैसे गावातील व्यक्तीला मिळतात. 1 रुपयाचा देखील भष्ट्राचार होत नाही, असे या कार्यक्रम प्रसंगी बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले. शिवाय देशातील विविध विकासाच्या मुद्यावरही त्यांनी भाष्य केले.