पुणे - शहर व जिल्ह्यात कोरोना महामारीने थैमान घातले होते. वाढत्या कोरोनाबाधित रुग्ण संख्येने प्रशासन चिंतीत झाले होते. मात्र मागील 2 दिवसांपासून वाढत्या कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यात प्रशासनाला यश आल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहरातील नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.
४ मे रोजी मंगळवारी शहरात दिवसभरात २८७९ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे, तर दिवसभरात ३६७८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच सोमवारी (३ मे) देखील दिवसभरात २५७९ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली होती. तर दिवसभरात ४०४६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. तसेच सोमवारी ७९ रुग्णांचा मृत्यू झाला होता त्यातले १८ रुग्ण पुण्याबाहेरील होते.