पुणे - राज्यासह पुणे शहरात गेल्या आठवड्याभरापासून कोरोनाबाधितांचे प्रमाण हे कमी होत आहे. आठवड्याभरापासून कोरोनाबाधितांपेक्षा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे वाढत आहे. राज्य शासनाच्या वतीने लावण्यात आलेल्या कडक संचारबंदीमुळे दुसऱ्या लाटेतील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे, असे मत इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले आहे.
कडक संचारबंदीचा निर्णय योग्य, त्यामुळे रुग्णसंख्या आटोक्यात - डॉ. अविनाश भोंडवे
राज्य शासनाच्या वतीने लावण्यात आलेल्या कडक संचारबंदीमुळे दुसऱ्या लाटेतील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. असे मत इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले आहे.
कडक संचारबंदीचा निर्णय योग्यच -
राज्यात फेब्रुवारी महिन्यापासून मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. राज्यात दिवसभरात 60 हजारहुन अधिक कोरोनाबधितांचा आकडा पोहचला होता.वाढत्या कोरोनाच्या पाश्वभूमीवर राज्य सरकारच्यावतीने एप्रिल महिन्याच्या सुरवातीला ब्रेक द चेन मोहिमे अंतर्गत कडक निर्बंध आणि शनिवारी - रविवारी विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर ही रुग्णसंख्या वाढत चालली होती. पुन्हा राज्य सरकारने कडक निर्बंध लावले आणि हे जे काही राज्य सरकारच्यावतीने निर्बंध लावण्यात आले आहे, याचा परिणाम वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर झाला आहे. राज्य सरकारच्या वतीने कडक लॉकडाऊनचा जो निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णसंख्या कमी झाली आहे असे स्पष्ट मत यावेळी डॉ.भोंडवे यांनी व्यक्त केले.
कडक संचारबंदी वाढवली पाहिजे तरच रुग्णसंख्या कमी होईल -
राज्य सरकारच्यावतीने 1 मे पर्यंत कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कडक संचारबंदीमुळेच रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. राज्य सरकारने कडक संचारबंदी 1 मे नंतर देखील 2 आठवड्याकरिता वाढवली पाहिजे. कारण ज्या पद्धतीने वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा आलेख हा या कडक संचारबंदीमुळे कमी झाले आहे अशा पद्धतीने जर पुढे कडक संचारबंदी लागू केली तर ही रुग्णसंख्या लवकरच आटोक्यात येईल असं ही यावेळी भोंडवे म्हणाले.