पुणे :पुण्यातल्या मुळशी तालुक्यातला हृदय हेलावून टाकणारा प्रकाश समोर आला (Hirdi village Mulshi) आहे. मृत्यूनंतरही रस्त्याचा संघर्ष गावकऱ्यांना करावा लागत आहे. गावाला रस्ता नसल्यामुळे झोळीमध्ये घालूनमृतदेह अक्षरशः आठ किलोमीटर पायी घेऊन नागरिकांना जावे लागत (Death Bodies Carried on Shoulders)आहे.
Death Bodies Carried on Shoulders : मृत्यूनंतरही रस्त्याचा संघर्ष ; रस्त्याअभावी गावात पोहचण्यासाठी मृतदेह खांद्यावर घेऊन पायपीट - पुणे रस्ते समस्या
पुण्यातल्या मुळशी तालुक्यातला हृदय हेलावून टाकणारा प्रकाश समोर आला (Hirdi village Mulshi) आहे. गावाला रस्ता नसल्यामुळे झोळीमध्ये घालून मृतदेह अक्षरशः आठ किलोमीटर पायी घेऊन नागरिकांना जावे लागत (Death Bodies Carried on Shoulders)आहे.
![Death Bodies Carried on Shoulders : मृत्यूनंतरही रस्त्याचा संघर्ष ; रस्त्याअभावी गावात पोहचण्यासाठी मृतदेह खांद्यावर घेऊन पायपीट Death Bodies Carried on Shoulders](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16660162-thumbnail-3x2-mulshi.jpg)
8 किलोमीटरची पायपीट -मुळशीतल्या दुर्गम भागातले मूळचे हिरडी गावातील जेष्ठ नागरीक भिकू मेंगेडे यांचं पनवेलमध्ये वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे शव मुळगावी आणण्यासाठी घुटके गावापर्यंत ऍम्ब्युलन्समधून आणण्यात आले. मात्र तिथून पुढे हिरडी गावाकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने, झोळी करून खांद्यावर तब्बल 8 किलोमीटरची पायपीट करत मृतदेह हिरडी गावात आणावा (death bodies on shoulders) लागला. रस्त्याअभावी आडवाटेनं पावसामुळं झालेल्या चिखलातून वाट काढत, मृतदेह अणावा लागल्यानं तीव्र संताप नागरिक व्यक्त करत आहेत. एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करत असनाता, आजही दुर्गम भागात काही ठिकाणी रस्ता, पाणी, वीज या सारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्यानं नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली (no road to Hirdi village Mulshi) आहे.
मृत्यूनंतर तरी हेडसाळ थांबवा-स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त देशभर वेगवेगळे कार्यक्रम होत असताना मुळशी, पुणे जिल्ह्यातील जे दुर्गम भाग आहेत. त्या भागांमध्ये अनेक वाड्या आहेत. अनेक आदिवासी लोक या भागांमध्ये राहतात, त्यांना अजूनही पाणी, वीज, आणि मृत्यूनंतर जाण्यासाठी रस्ता सुद्धा सरकार देऊ शकत नाही. ही स्वातंत्र्य भारताची सद्य परिस्थिती आहे. नागरिक दरवेळेस संताप व्यक्त करतात. परंतु सरकार केव्हा जागे होणार ? हाच एक प्रश्न आहे. नागरिकांची मृत्यूनंतर तरी हेडसाळ थांबवावी, एवढीच अपेक्षा या गावातील नागरिक व्यक्त करत (Hirdi village Mulshi) आहेत.