पुणे: धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे ( Dashing administrative officer Tukaram Munde ) यांनी काही दिवसांपूर्वी आरोग्य सेवा आणि संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान पदाचा ( Health Services and Director National Health Mission post ) कार्यभार स्वीकारला आहे. तुकाराम मुंढे हे अतिशय शिस्तबद्ध आय ए एस अधिकारी ( IAS Officer ) म्हणून ओळखले जातात. ज्या विभागात तुकाराम मुंढे जातात त्या विभागात ते आपल्या कामाने छाप पडतात अशी त्यांची ओळख आहे.
पदभार स्वीकारताच धाडसत्राला सुरुवात : तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुरुवारी रात्रीच्या सुमारास राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे आरोग्य उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह वरिष्ठ डॉक्टरांकडून धाडसत्राला सुरुवात झाली आहे. पुण्यातील आळंदी वाघोली येथील ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास धाड टाकण्यात आलेली आहे. रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर डॉक्टर उपस्थित नसल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली होती. मात्र या ठिकाणी डॉक्टर उपस्थित असल्याचे निदर्शनात आल्यानंतर कारवाई टळली आहे.