महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गुढी पाडव्याला मंदिराबाहेरूनच 'दगडूशेठ गणपतीचे' दर्शन - श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर बंद असणार आहे. त्यामुळे मंदिराच्या बाहेरूनच भाविकांनी गणपतीचे दर्शन घेतले.

गुढी पाडव्याला मंदिराबाहेरूनच 'दगडूशेठ गणपतीचे' दर्शन
गुढी पाडव्याला मंदिराबाहेरूनच 'दगडूशेठ गणपतीचे' दर्शन

By

Published : Apr 13, 2021, 10:32 AM IST

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर बंद असणार आहे. त्यामुळे मंदिराच्या बाहेरूनच भाविकांनी गणपतीचे दर्शन घेतले. दरम्यान, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा ३८ वा वर्धापन दिन आहे.

३८ वा वर्धापन दिन

गुढी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आकर्षक सजावट मंदिरात केली जाते. यंदा कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर मंदिर बंद असल्याने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी बाहेरूनच दर्शनाचा लाभ घेतला. गणपती मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी गुढीपाडवा ते रामनवमीदरम्यान संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते. मंदिराचा यावर्षी ३८ वा वर्धापन दिन आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यावर्षीचा संगीत महोत्सव व इतर कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

भाविकांची तुरळक गर्दी
चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढीपाडव्याला मंदिरात आकर्षक सजावट केली जाते. तसेच भाविकांचीही मोठी गर्दी पाहायला मिळते. यंदा मंदिराबाहेरूनच दर्शन असल्याने भाविकांची तुरळक गर्दी पाहायला मिळाली. संपूर्ण विश्वावरचे कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे, अशी प्रार्थना विश्वस्तांनी गणराया चरणी केली. ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंदिरात धार्मिक कार्यक्रमदेखील पार पडले. तसेच पारंपरिक पध्दतीने गुढी उभारण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details