पुणे -राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे पुणे दौऱ्यावर ( President Kovind Pune Tour ) होते. यावेळी त्यांनी श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या १२५ व्या वर्षाच्या समारंभाला उपस्थित राहून संबोधित केले. तेव्हा बोलताना राष्ट्रपतींनी पुण्यातील गणपती मंदिर आणि दत्तात्रेय मंदिराच्या स्थापनेसाठी दगडूशेठ कुटुंबीयांचे कौतुक केले. गणपती उत्सव साजरा करण्यामध्ये दगडूशेठ यांचा लोकमान्य टिळकांशी जवळचा संबंध आहे. आपल्या राष्ट्रीय राजकारणात गणपती उत्सवाचे अमूल्य योगदान आहे. हा सण ब्रिटीश राजवटीविरुद्ध राष्ट्रवाद आणि सामाजिक समरसतेचा स्रोत म्हणून उदयास आला आहे, असेही राष्ट्रपती कोविंद यांनी म्हटले आहे.
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमांसाठी अशा सामाजिक कल्याकणकारी योजना राबवतात. त्यानिमित्त दगडूशेठ कुटुंबीय आणि ट्रस्टच्या सामाजिक व कल्याणकारी उपक्रमांचे राष्ट्रपतींनी कौतुक केले.