महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Police Appeal To Students: फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे सायबर पोलीसांचे आवाहन - cheated students

आरोग्य भरती, (Health Recruitment) म्हाडा (MHADA) आणि टीईटी परीक्षा (TET exam) फुटी प्रकरणात पुणे सायबर पोलिसांसोबत (Cyber police ) युनिट वन आणि फोरचे अधिकारी तपास करणार आहेत.आरोपींनी टीईटीच्या परीक्षेचा पेपर देण्याच्या आमिषाने अनेकांकडून पैसे घेतल्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांची फसवणूक झाली (cheated students ) अशा विद्यार्थ्यांनी पुढे यावे आणि सहकार्य करावे असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

Police Appeal To Students
पोलीसांचे विद्यार्थ्यांना आवाहन

By

Published : Dec 18, 2021, 1:27 PM IST

पुणे:आरोग्य भरती, म्हाडा आणि टीईटी परीक्षा फुटी प्रकरणात पोलीस तपास करत आहेत आरोपींनी टीईटी परीक्षेचा पेपर देण्याचे आमिष देत अनेकांकडून पैसे घेतले असल्याची शक्यता आहे. त्यामुळे यांची फसवणूक झाली त्यांनी समोर यावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पोलीसांचे विद्यार्थ्यांना आवाहन

शिवाय ज्या दिवशी म्हाडाचा पेपर फुटला त्यादिवशी रात्रीपर्यंत प्रीतिष देशमुखच्या मोबाईलवर अनेकांचे फोन येत होते. या सर्वांना देखील चौकशीसाठी बोलावले जाणार आहे.टीईटी परीक्षेत पैसे देऊनही काम न झालेल्या विद्यार्थ्यांनी तपासात सहकार्य करावे. असे आवाहन करण्यात आले आहे. आरोग्य, म्हाडा पेपर फुटी आणि टीईटी परीक्षेचे झालेला गैरव्यवहाराचा तपास करण्यासाठी सायबर पोलिस ठाण्याचे 70 कर्मचारी तपास करत आहेत. यामध्ये वीस अधिकारी आहेत. दरम्यान आरोग्य भरती पेपरफुटी आणि त्यांनतर म्हाडा पेपर फुटी आणि टीईटी परीक्षेत देखील गैरकारभार केल्या प्रकरणात राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे आणि शिक्षण आयुक्ताचा सल्लागार अभिषेक सावरीकर यांना अटक करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणातील आरोपींना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details