पुणे - सीमाशुल्क विभागाने (कस्टम) कारवाई करत तब्बल दोन कोटी किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. यामध्ये 868 किलो गांजा आणि साडेसात किलो चरसचा समावेश आहे. याची अंदाजे किंमत दोन कोटी रुपये आहे.
पुण्यात कस्टम विभागाकडून दोन कोटींच्या गांज्यासह चरस जप्त; चौघांना अटक
सीमाशुल्क विभागाने (कस्टम) कारवाई करत तब्बल दोन कोटी किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. यामध्ये 868 किलो गांजा आणि साडेसात किलो चरसचा समावेश आहे. याची अंदाजे किंमत दोन कोटी रुपये आहे.
आंध्रप्रदेशातून महाराष्ट्रात एका ट्रकमधून हे अंमली पदार्थ घेऊन जाणार आसल्याची माहिती सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुणे-सोलापूर महामार्गावर सापळा रचला. नळदुर्ग परिसरात एक ट्रक संशयास्पदरितीने येताना दिसला. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ट्रकला थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याने पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून ट्रक चालकाला ताब्यात घेतले.
ट्रकची तपासणी केल्यानंतर केबिनमध्ये वरच्या भागात लपवून ठेवलेले अंमली पदार्थ सापडले. यामध्ये 868 किलो गांजा आणि साडेसात किलो चरस आढळले आहे. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून दोन ट्रक आणि चार जणांना ताब्यात घेतले आहे.