महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी; धबधब्याचा घेतला आनंद - Crowds of tourists in Lonavla on the occasion of Tourist Day;

लोणावळा शहर हे पर्यटनस्थळ म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी पुणे, मुंबईसह, परराज्यातून आणि देशातून पर्यटक येथील पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी येत असतात. पावसाळ्यात येथील निसर्गसौंदर्यं अधिकच खुलते. त्यामुळे यंदा जूनच्या सुरूवातीलाच चांगला पाऊस पडल्याने पर्यटकांची गर्दी पाहण्यास मिळते.

लोणावळ्यात गर्दी
लोणावळ्यात गर्दी

By

Published : Jun 19, 2021, 9:40 AM IST

पिंपरी-चिंचवड - लोणावळ्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. आठवडाभरापासून शहरासह परिसरात वरून राजाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबई आणि पुणेकर पर्यटकांना आकर्षित करणारे धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. शुक्रवारी सकाळपासूनच अनेक पर्यटकांनी लोणावळ्याच्या पर्यटनस्थळी हजेरी लावून कुटुंबासह मनमुराद आनंद लुटला.

लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी

लोणावळा शहर हे पर्यटनस्थळ म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी पुणे, मुंबईसह, परराज्यातून आणि देशातून पर्यटक येथील पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी येत असतात. पावसाळ्यात येथील निसर्गसौंदर्य अधिकच खुलते. यंदा गेल्यावर्षीपेक्षा चांगला पाऊस पडल्याचे हवामान विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. गेल्या 24 तासात तब्बल 148 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत या मोसमात 539 मिलिमीटर पाऊल पडला. गेल्या वर्षी 392 मिलिमीटर इतक्याच पावसाची नोंद होती. असाच पाऊस कायम असल्यास भुशी धरण ओसंडून वाहण्याची चिन्हे आहेत. टायगर, लायन पॉईंट तसेच कुने धबधबा या ठिकाणी पर्यटकांनी गर्दी केल्याचे दृ्श्य पाहायला मिळालं.

हेही वाचा -राज्यात शनिवारपासून ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात

ABOUT THE AUTHOR

...view details