महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ganeshotsav 2021 : विविध प्रकारच्या मोदक खरेदीसाठी पुणेकरांची गर्दी

पुण्यातील काका हलवाई येथे विविध प्रकारच्या मोदक खरेदीला पुणेकरांनी गर्दी केली आहे. यंदा किमतीत जरी वाढ झाली असली तरी आपल्या लाडक्या बाप्पासाठी मोदक खरेदीला नागरिकांनी गर्दी केली आहे. पुणेकरांनी यंदा उकळीच,चॉकलेट आणि माव्याच्या मोदकाला जास्त पसंती दिली जात आहे.

मोदक खरेदी
मोदक खरेदी

By

Published : Sep 9, 2021, 8:28 PM IST

Updated : Sep 9, 2021, 8:39 PM IST

पुणे -गणपती बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहे. त्यामुळे सगळीकडे आगमनाची जय्यत तयारी सुरु आहे. लाडक्या बाप्पाच्या पाहुणचारात काही कमी पडू नये, यासाठी सर्वजण सज्ज झालेत. मात्र १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असणाऱ्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाला मोदक फार आवडतात. मोदकांचा अर्थ आनंद देणारा पदार्थ असेही म्हटले जाते. मोदक हे ज्ञानाचे प्रतिक देखील मानले जाते. त्यामुळे ज्ञानाचे देवता असणाऱ्या गणपती बाप्पाला हा नैवद्य जास्त आवडतो. त्यामुळे आपल्या घरी किंवा सार्वजिनक मंडळांत बाप्पाचा पाहुणचार करण्यासाठी त्याला मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात येतो.

आढावा घेतांना प्रतिनिधी

पुण्यातील काका हलवाई येथे विविध प्रकारच्या मोदक खरेदीला पुणेकरांनी गर्दी केली आहे. यंदा किमतीत जरी वाढ झाली असली तरी आपल्या लाडक्या बाप्पासाठी मोदक खरेदीला नागरिकांनी गर्दी केली आहे. पुणेकरांनी यंदा उकळीच,चॉकलेट आणि माव्याच्या मोदकाला जास्त पसंती दिली जात आहे. तसेच एका कार्यकर्त्याच्या सूचनेनुसार यंदाच्या उत्सवात काका हलवाईकडून तब्बल २०० किलोचे मोदक बनवण्यात येणार आहे.

Last Updated : Sep 9, 2021, 8:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details