पुणे - दिवसेंदिवस पुणे शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शहरात 10 दिवसाचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सुरूवातीचे 5 दिवस कडक लॉकडाऊन होता. आजपासून काही प्रमाणात शिथिलता देण्यात येणार होती. जास्त गर्दी होऊ नये म्हणून महापालिकेने आज सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत भाजीपाला, किराणा चिकन, मटण याची दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, शहरातील महात्मा फुले मंडईत भाजीपाला खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. येथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे.
महात्मा फुले मंडईत भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची गर्दी.... - महात्मा फुले मंडई न्यूज
दिवसेंदिवस पुणे शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शहरात 10 दिवसाचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सुरूवातीचे 5 दिवस कडक लॉकडाऊन होता. आजपासून काही प्रमाणात शिथिलता देण्यात येणार होती. जास्त गर्दी होऊ नये म्हणून महापालिकेने आज सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत भाजीपाला, किराणा चिकन, मटण याची दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली.
उद्यापासून (20 जुलै) भाजीपाला, किराणा चिकन, मटणची दुकाने सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. गर्दी होऊ नये म्हणून प्रशासनाने आज दिवसभर शिथिलता दिली आहे. मात्र, असे असतानाही शहरातील महात्मा फुले मंडईत मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. भाजीपाला खरेदीसाठी नागरिक गर्दी करत आहे. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे.
शहरात दिवसेंदिवस कोरोनाची परिस्थितीती गंभीर होत असताना नागरिकांमध्ये गांभीर्य पाहायला मिळत नाही. लोक विविध वस्तू खरेदीसाठी रस्त्यावर येऊन गर्दी करत आहेत. दिलेले नियम पळत नसल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.