पुणे - उद्यापासून मुख्य शहरासह पिंपरी-चिंचवडमध्ये दहा दिवसाचे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. यावेळी लॉकडाऊन पूर्वीपेक्षा जास्त कडकपणे राबवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेने हा निर्णय घेतला आहे.
या काळात फक्त दुध आणि औषध वगळता अन्य सर्व दुकाने बंद असणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आता जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यासाठी शहरातील बाजारात गर्दी केलीय. पुण्याच्या गुलटेकडी येथील फळबाजारात आज सकाळपासूनच नेहमीपेक्षा जास्त गर्दी आहे. भाजीपाला आणि फळ विकत घेण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात या बाजारपेठेत आलेत. अचानक गर्दी वाढल्याने या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांवर ताण पडलाय. गर्दी वाढल्याने कोणतेही सोशल डिस्टन्सिंग होत नाहीय.