महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Child marriage Crime : पालकांनी जबरदस्तीने बालविवाह दिला लावून; महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केली मुलीची सुटका

जबरदस्तीने लावूव दिलेला बालविवाह (Child marriage) रोखण्यात महिला आयोगाच्या अध्यक्षांना यश आले (State Women Commission)आहे. पुण्यातील खेड शिवपूर येथे ही घटना घडली असून, माहेर तसेत सासरच्या मंडळीविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर, पीडित मुलीला पुण्याच्या बालसुधार गृहात (police filed case)पाठण्यात आले आहे.

रुपाली चाकणकर
Rupali Chakankar

By

Published : Jun 6, 2022, 10:19 AM IST

पुणे : पालकांने जबरदस्तीने लावून दिलेला बालविवाह (Child marriage) महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी रोखला. काही वर्षात बालविवाहच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणत वाढ झाली असून, राज्य महिला आयोगाच्या वतीने बाल विवाह रोखण्यासाठी ताबडतोड अँक्शन देखील घेतल जात आहे.अशीच एक बालविवाहची घटना पुण्यातील खेड शिवापूर येथे घडली असून, त्या मुलीचं जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आले होत. पण मुलीने महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना याबाबत माहिती दिली असता त्यांनी लगेच पोलिसांच्या मदतीने संबधित मुलीची सुटका केली.

मिळालेली माहिती अशी की, खेड शिवापूर येथील एका सतरा वर्षीय मुलीचा तिच्या कुटुंबीयांनी जबरदस्तीने बालविवाह लावून दिला होता. लग्ना नंतर सासरच्या आणि माहेरच्या लोकांच्या प्रचंड दबावामुळे या मुलीला घराबाहेर पडणे देखील अशक्य झाले होते. या त्रासाला कंटाळूल तिने थेट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा (Women Commission) रुपाली चाकणकर यांची भेट घेतली. यावेळी मुलीने आपल्यावर झालेल्या अन्यायाची माहिती त्यांना दिली. चाकणकर यांनी क्षणाचाही विलंब न करता संबंधित पोलीस ठाण्याला माहिती देऊन पोलिसांना तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले.

पोलिसांनी देखील याप्रकरणी बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार (Child Marriage Act) तात्काळ गुन्हा दाखल करुन घेत मुलीच्या माहेरच्या तसेच सासरच्या लोकांवर कारवाई केली. तर, मुलीची रवानगी पुण्याच्या बाल सुधारणा गृहात केली आहे.महाराष्ट्रामध्ये कोणत्याही ठिकाणी जर बालविवाह होत असल्याचे आढळून आल्यास राज्य महिला आयोगाच्या १५५२०९ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलं.

हेही वाचा- Nagpur Crime News : बोंबला! दोघांशी विवाह तरीही तरुणीचा तिसऱ्यावर जडला जीव; प्रेमाचा असाही चौकोन

ABOUT THE AUTHOR

...view details