पुणे -शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात मागील काही दिवसांपासून अवैधरित्या पिस्तुल बाळगण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर उघडकीस येत आहेत. एकीकडे उच्चभ्रू वर्गातील नागरिक पिस्तुल बाळगण्यासाठी कायदेशीर अर्ज करत असतानाच दुसरीकडे मात्र अवैधरित्या पिस्तुलं विक घेणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. मागील नऊ महिन्यात पुणे शहरात 59 गावठी पिस्तुलं आणि 109 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
शहरात अवैध धंदे आणि अवैधरित्या पिस्तूल बाळगणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले होते. गुन्हे शाखेला चंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील परिसरात काहीजण पिस्तुल आणि जिवंत काडतुसांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून संशयास्पदरित्या फिरणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या अंग झडतीत दोन गावठी पिस्तुलं आणि एक गावठी कट्ट्यासह सहा जिवंत काडतुसे सापडली.
समाधान लिंगप्पा विभुते (वय 28) आणि गोपाल रमेश मुजमुले (वय - 21) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात चंदनगर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कलम कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
शिक्षणाचं महेरघर शस्त्रांचं आगार?
शिक्षणाच्या माहेरघरात अवैधरित्या पिस्तुल बाळगणाऱ्यांची संख्या वाढली - पुण्यात बेकायदा पिस्तुल बाळगणाऱ्या दोघांना अटक
एकीकडे उच्चभ्रू वर्गातील नागरिक पिस्तुल बाळगण्यासाठी कायदेशीर अर्ज करत असतानाच दुसरीकडे मात्र अवैधरित्या पिस्तुलं विकत घेणाऱ्यांची संख्याही वाढली आहे.
शिक्षणाच्या माहेरघरात अवैधरित्या पिस्तुल बाळगणाऱ्यांची संख्या वाढली
मागील महिन्यात पुणे पोलिसांनी अवैधरित्या पिस्तुल बाळगणार्या 9 जणांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून गावठी पिस्तुल आणि 15 जिवंत काडतुसे असा एकूण चार लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर यावर्षी आतापर्यंत अवैधरित्या पिस्तुल बाळगल्याप्रकरणी 41 गुन्हे दाखल करण्यात आले असून यातील 52 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून 59 गावठी पिस्तुलांसह 106 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.