पुणे :मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या धर्तीवर आता पुणे जिल्हा परिषदमध्ये सुद्धा वॉर रूम तयार करण्यात आले (Creation of war room in Pune Zilla Parishad) आहे. या माध्यमातून जिल्ह्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत, त्यावर लक्ष दिले जाणार (war room for various schemes) आहे. आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रण ठेवण्याचे कामही वॉर रूम माध्यमातून करण्यात येणार आहे.
विकास योजना निरीक्षण कक्ष -कोरोना काळात जिल्हा परिषदमध्ये एकाच मधून वॉर रूममधून कामकाज करण्यात आलं. त्याचाच अनुभव लक्षात घेता, अशी एक कायमस्वरूपी वॉर रूम राहावी ही संकल्पना पुढे आली. आणि त्यातूनच आता जिल्हा परिषदेमध्ये वॉर रूम तयार करण्यात आले आहे. यामध्ये एक निरीक्षण युनिट तयार करण्यात आलं, या युनिटचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. विकास योजना निरीक्षण कक्ष, असे नाव देण्यात आले असून यात सहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कक्षात व्हिडिओ कॉन्फरन्स सिंग आणि संवादासाठी आधुनिक यंत्रणा बसवण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या परवेक्षण आणि मूल्यमापन आर्थिक प्रमुखाच्या निधीचे वितरण सुविधा देण्यात येणार (War Room Pune Zilla Parishad) आहेत.