पुणे : भारतात 'कोवोवॅक्स' या कोरोनावरील दुसऱ्या लसीच्या चाचणीला सुरूवात झाली आहे. सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पुनावाला यांनी याची माहिती दिली आहे. येत्या सप्टेंबरपर्यंत ही लस उपलब्ध होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
अदर पुनावालांचे ट्विट
सीरम इन्स्टिट्यटुचे सीईओ अदर पुनावाला यांनी शनिवारी ट्विट करून याची माहिती दिली. "अखेर भारतात कोवोवॅक्सच्या चाचणीला सुरूवात झाली आहे. नोवावॅक्स आणि सीरम इन्स्टीट्युटकडून एकत्रितरित्या या लसीचे उत्पादन केले जामार आहे. आफ्रिकन आणि ब्रिटीश व्हॅरीएन्टवर ही लस 89 टक्के परिणामकारक असल्याचे दिसून आले आहे. सप्टेंबर 2021 पर्यंत ही लस उपलब्ध होऊ शकते." असे ट्विट पुनावाला यांनी केले आहे.