पुणे-जगात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना रोगावर भारतातील पहिल्या 'कोवीशिल्ड' लसीचे डोस आज पहाटे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमधून पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास विमानतळाकडे रवाना झाले. त्यामुळे देशातील नागरिकांना कोरोनाची लस मिळण्याची प्रतिक्षा जवळपास संपली आहे.
सहा कंटेनरमधून होणार लसीची वाहतूक -
सीरमच्या लशीचे तीन कोल्डस्टोरेज कंटेनर प्रथम पाठवण्यात आले आहेत. सोमवारी सायंकाळी 6 कंटेनर इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले होते. त्यातले पहिले तीन कंटेनर आज पहाटे रवाना झाले आहेत. यावेळी कंटेनरमध्ये लसीचे डोस भरल्यानंतर त्याची आतमध्ये नारळ फोडून पूजा करण्यात आली. यावेळी सिरम इन्स्टिट्यूटचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तर पोलिसांचादेखील मोठा बंदोबस्त तैनात होता. परिमंडळ पाचच्या उपायुक्त नम्रता पाटील या पहाटेपासून स्वतः येथे हजर होत्या. कंटेनर ठीक चार वाजून 55 मिनिटांनी गेट क्रमांक दोनमधून बाहेर पडला. यावेळी तीन कंटेनर पाठवण्यात आले. तर आता दिवसभरात एकूण 6 कंटेनर हे डोस घेऊन जाणार आहेत.
हेही वाचा-पंतप्रधानांनी स्वतः लस घेत कोरोना लसीकरणाची सुरुवात करावी - नवाब मलिक