महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pune : पोटच्या मुलाला 2 वर्ष कोंडले श्वानाच्या रुममध्ये, मुलगा वागू लागला श्वानासारखे - मुलगा वागु लागला श्वानासारखे

पुण्यातील कोंढवा भागात राहणार्‍या आई वडीलांनी 11 वर्षाच्या पोटच्या मुलाला तब्बल 22 हून अधिक श्वानासोबत एका रूममध्ये डांबून ठेवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आई वडीलाविरोधात बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम सन 2000 चे कलम 23, 28 प्रमाणे कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये 9 तारखेला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( couple locked 11 year old son in room with dogs )

boy tied up with dog room
मुलगा वागु लागला श्वानासारखे

By

Published : May 11, 2022, 5:22 PM IST

Updated : May 11, 2022, 6:43 PM IST

पुणे - पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील कोंढवा भागात राहणार्‍या आई वडीलांनी 11 वर्षाच्या पोटच्या मुलाला तब्बल 22 हून अधिक श्वानासोबत एका रूममध्ये डांबून ठेवल्याची घटना घडली ( couple locked 11 year old son in room with dogs ) आहे. या प्रकरणी आई वडीलाविरोधात बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम सन 2000 चे कलम 23, 28 प्रमाणे कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये 9 तारखेला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय लोधरिया वडील आणि शितल लोधरिया आई असे आरोपी आई वडीलांची नावे आहेत.

मुलाला कोंडलेल्या रुममधील व्हिडिओ


मुलांना कोंडून ठेवले खोलीमध्ये - कोंढवा येथील कृष्णाई इमारतीमध्ये संजय लोधरिया आणि शितल लोधरिया राहतात. ते राहत असलेल्या घरात 20 ते 22 श्वान आहेत. श्वान असलेल्या रूम 11 वर्षाचा मुलगा जवळपास दोन वर्षापासून कोंडून ठेवला आहे. त्यामुळे तो मुलगा खिडकीत बसतो आणि श्वानासारखे वर्तण करतो. त्याबाबत चाईल्ड लाईन संस्थेच्या समन्वयक अपर्णा मोडक यांना एकाने फोनवरून माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी तिथे जाऊन पाहणी केली. तेव्हा 11 वर्षाचा मुलगा एक रूममध्ये होता आणि त्याच्या आजूबाजूला विविध वयोगटाची 20 ते 22 श्वान आढळून आली. तो मुलगा बेडवर झोपलेल्या अवस्थेत होता. त्यावेळी मुलाच्या आई वडीलांना मुलांच्या आरोग्य विषयी सांगून त्या आल्या. त्यानंतर पुन्हा त्यांना मुलाच्या घरी जाऊन पाहणी केली, त्यावेळी तोच प्रकार आढळून आला. त्यानंतर अपर्णा मोडक यांनी आम्हाला वरील आधिकाऱ्यांना ही हकिकत सांगितली. त्यानुसार त्यांनी कोंढवा पोलीस स्टेशन गाठून याबाबत सविस्तर तक्रार दाखल केली.

पोलीस अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

आई वडीलांवर गुन्हा दाखल - तक्रारदार अपर्णा मोडक यांनी याबाबत आमच्याकडे याबाबत तक्रार देताच, कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी श्वान असलेल्या रुममध्ये तो मुलगा आढळून आला. त्यानुसार आरोपी वडील संजय लोधरिया आणि आरोपी आई शितल लोधरिया यांच्या विरोधात बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम सन 2000 चे कलम 23, 28 प्रमाणे गुन्हा दाखल केला. या प्रकरणी आरोपी वडील आणि आई या दोघांकडे चौकशी सुरू आहे. तर मुलाचे समुपदेशन करण्यात येत असल्याचे कोंढवा पोलिसानी सांगितले.

कोंढवा पोलीस स्टेशन

मुलाचे समुपदेशन सुरू - 2 वर्षांहून अधिक काळापासून श्वानांसोबत राहत आहे. त्यामुळे तो मुलगा श्वानासारखेच वागत आहे. मुलाचे समुपदेशन करण्यात येत आहे, असे देखील यावेळी पोलिसांनी सांगितले.

अशी होती त्या घराची दयनीय अवस्था -वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी मुलाची सुटका करतानाचा अनुभव सांगितला आहे. पीडित लहान मुलाची त्या घरातून सुटका करणे खरोखर कठीण काम होते. कारण ती सर्व श्वान भटकी होती. त्यांची नसबंदी झालेली नव्हती. शिवाय ती केव्हाही हिंस्र रूप धारण करू शकत होती. त्याचबरोबर घरामध्ये सर्वत्र प्राण्यांनी घाण केलेली होती. अशा अस्वच्छ ठिकाणी तब्बल 22 कुत्र्यांच्या सान्निध्यात हा 11 वर्षांचा लहान मुलगा अडकलेला होता. अशी भयावह परिस्थिती सागर पाटील यांनी सांगितली आहे. लहान मुलांना प्राण्यांच्या सान्निध्यात कोंडून ठेवणे आणि त्यामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होणे, हा एक प्रकारचा गुन्हा असून त्यांना कायद्यानुसार अटक केली जाईल असे देखील पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा - Grandson of a Former Lieutenant : इंग्रजी बोलल्याबद्दल जीवघेणी शिक्षा! माजी लेफ्टनंटच्या नातवाच्या अंगावर सोडला कुत्रा

Last Updated : May 11, 2022, 6:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details