पुणेराष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, सरदार वल्लभाई पटेल, नेताजी सुभाष चंद्र बोस, सरोजिनी नायडू, पंडित जवाहरलाल नेहरू, पंडित मोतीलाल नेहरू अशा अनेक महान स्वातंत्र्य सेनानींनी या येरवडा तुरुंगात कारावास भोगला. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झालेला ऐतिहासिक पुणे करार Historic Pune Agreement देखील या येरवडा तुरुंगाच्या प्रांगणात Yerawada Jail झाला होता. हा तुरुंग अशा अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार ठरला आहे. देशातल्या पहिल्या 'जेल टुरिझम'ला पुण्यातल्या Jail tourism Pune येरवडा तुरुंग Yerawada Jail येथून सुरुवात झाले. महाराष्ट्रातील सर्वात मोठा तुरुंग म्हणून येरवडा तुरुंगाकडे पाहिले जाते. या तुरुंगाला तब्बल दीडशे वर्षांचा इतिहास आहे. ब्रिटिश राजवटीत या तुरुंगाची बांधणी केली गेली होती. स्वातंत्र्यपूर्व काळात या तुरुंगामध्ये भारताचे अनेक महान स्वातंत्र्य सेनानी ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढताना या तुरुंगात बंदिस्त करण्यात आले होते.
येरवडा तुरुंगात अनेक स्वातंत्र्यवीरांना बंदिवासराष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, सरदार वल्लभाई पटेल, नेताजी सुभाष चंद्र बोस, सरोजिनी नायडू, पंडित जवाहरलाल नेहरू, पंडित मोतीलाल नेहरू अशा अनेक महान स्वातंत्र्य सेनानींनी या येरवडा तुरुंगात कारावास भोगला. तसेच, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झालेला ऐतिहासिक पुणे करार देखील या येरवडा तुरुंगाच्या प्रांगणात झाला होता. या तुरुंगात महात्मा गांधींना बंदी म्हणून ठेवण्यात आले होते. त्या बराकीसमोर असलेल्या झाडाखाली महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे करारावर सही केली होती.