पुणे - कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहता पुणे शहराला भाजीपाला पुरवठा करणारे मार्केटयार्ड उद्यापासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मार्केटयार्डच्या आजूबाजूच्या परिसरात कोरोना व्हायरसचे रुग्ण सापडल्यामुळे अनेक परिसर सील करण्यात येत आहे. तसेच कर्फ्यु देखील लावण्यात आला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत व्यापार करणे धोक्याचे असल्याचे आडते असोसिएशनच्या सर्व सभासदांनी प्रशासनाला कळवले होते. त्यामुळे परिस्थिती जोपर्यंत आटोक्यात येत नाही तोपर्यंत संपूर्ण गुलटेकडी मार्केट मधील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत.
#CoronaLockdown : पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती उद्यापासून बंद... - pune market yard close
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने महानगरपालिकेच्या सुचनेनुसार उद्या 10 एप्रिलपासून फळे, भाजीपाला, कांदा-बटाट्याचा घाऊक व्यापार पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा...'आरोग्य सेतू' अॅपडाऊनलोड करा, मोदींचे देशवासियांना आवाहन
श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या परिसरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे सर्व परिसर सील करुन कर्फ्यू लावला आहे. त्यामुळे जोपर्यंत परिस्थिती आटोक्यात येत नाही, तोपर्यंत संपूर्ण गुलटेकडी मार्केटयार्डमधील सर्व व्यवहार बंद ठेवावेत, अशी विनंती आडते असोसिएशनने कृषी उत्पन्न बाजार समितीला केली होती. त्यानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे ने शुक्रवार दिनांक 10 एप्रिल पासून फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा आणि केळीचा घाऊक व्यापार पुढील निर्णय होईपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जी. देशमुख यांनी सांगितले.