पुणे -कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. शहरातील मॉल, सिनेमागृहे, गार्डन बंद ठेवण्याचे आदेश शासनाच्या वतीने देण्यात आले आहेत. त्यामुळे आज रविवार असूनही शहरात अनेक ठिकाणी शुकशुकाट जाणवत आहे.
कोरोनाची धास्ती : पुण्यातील रस्त्यांवर शुकशुकाट...बागा..सिनेमागृहे बंद एरवी रविवारी गर्दीने ओसंडून वाहणारी सारसबाग आणि पेशवे गार्डनच्या प्रवेशद्वाराला कुलूप आहे. सारसबागेतील गणपतीचे मंदिरही बंद ठेवण्यात आले आहे. शहरांतील सर्वच गार्डन अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली आहेत.
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या पुणे शहरात शासकीय आणि खासगी कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे. घराबाहेर पडणे, अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.
हेही वाचा - विदेशातील १२ पाहुणे बुलडाण्यात; सर्दीची लक्षणे दिसल्याने तिघे आयसोलेशनमध्ये, नऊ जण देखरेखीखाली
हेही वाचा - रायगडमध्ये एकाला कोरोनाची लागन, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क