महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दगडूशेठ गणपती मंदिरात विशेष याग; कोरोना संकट निवारण्यासाठी यज्ञ - corona vishesh yaag

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भक्तांनी घराबाहेर न पडता घरबसल्या दर्शन घ्यावे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे.

दगडूशेठ हलवाई गणपती
Dagdusheth Halwai Ganpati Mandir

By

Published : May 19, 2021, 8:28 AM IST

Updated : May 19, 2021, 10:45 AM IST

पुणे - श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे कोरोना संकट निवारणासाठी विशेष यागांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये मृत्युंजय व धन्वंतरी महायाग मंगळवारी पार पडला. देशावरचे आणि राज्यावरचे कोरोनाचे वैश्विक संकट दूर व्हावे, याकरिता मंदिरामध्ये या विविध यागांचे आयोजन करीत गणरायाचरणी प्रार्थनादेखील करण्यात आली.

दगडूशेठ गणपती मंदिरात विशेष याग
विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजनवेदमूर्ती नटराज शास्त्री व ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत हे धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. सुरुवातीला महागणपती पूजा त्यानंतर महासंकल्प, पुण्यवाचनम्, स्थलशुद्धी, कलशस्थापना, सर्व देवता आवाहन, नवग्रह व नक्षत्र आवाहन, महा मृत्युंजय देवता आणि धन्वंतरी आवाहन, महा मृत्युंजय देवता आणि धन्वंतरी जप आणि होम-हवन करण्यात आले. आरतीने या धार्मिक कार्यक्रमाचा समारोप झाला.कोरोनाचा संकट दूर व्हावे यासाठी यागचे आयोजनकोरोना महामारीचे संकट दूर व्हावे, याकरीता हे याग करण्यात येत आहेत. दुस-या दिवशी उग्रनरसिंह व सुदर्शन महायाग होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भक्तांनी घराबाहेर न पडता घरबसल्या दर्शन घ्यावे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी ऑनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी यावेळी केले.
Last Updated : May 19, 2021, 10:45 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details