महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Omicron Pune : पुण्यातील ओमायक्रॉन रुग्णाच्या संपर्कातील सर्व 42 जणांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह - पुणे ओमायक्रॉन व्हेरियंट रुग्ण

आफ्रिकेतून पुण्यात आलेल्या नागरिकाला ओमायक्रॉनची (Omicron Variant in Pune) लागण झाली आहे. ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्णाच्या (Omicron Positive Patient) संपर्कातील संशयित ४२ जणांची चाचणी महापालिकेकडून करण्यात आली होती. त्या सर्वजणांचे रिपोर्टही निगेटिव्ह (Corona Negative Report) आले आहेत.

corona
कोरोना

By

Published : Dec 8, 2021, 3:10 PM IST

पुणे - आफ्रिकेतून पुण्यात आलेल्या नागरिकाला ओमायक्रॉनची (Omicron Variant in Pune) लागण झाली आहे. यानंतर पुणे महापालिका प्रशासन (PMC Alert) अलर्ट झाले. ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्णाच्या (Omicron Positive Patient) संपर्कातील संशयित ४२ जणांची चाचणी महापालिकेकडून करण्यात आली होती. त्या सर्वजणांचे रिपोर्टही निगेटिव्ह (Corona Negative Report) आले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात पुणेकरांसाठी दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.

  • रुग्णाच्या सोसायटीमध्ये राहणारे २५ जण निगेटिव्ह -

पुण्यातील डेक्कन परिसरात रविवारी ओमायक्रॉनचा एक रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेकडून त्याच्या निकटवर्तीयांसह ४२ जणांची 'आरटीपीसीआर' चाचणी करण्यात आली होती. त्यातील रुग्णाच्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या २५ जणांचे रिपोर्ट सोमवारी आले होते. उर्वरित १७ जणांचे रिपोर्ट आज आले असून, हे १७ जणही निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

  • नागरिकांनी घाबरू नये, मात्र कोरोना नियम पाळा-

ओमायक्रॉनबाधित रुग्णाबरोबर प्रवास केलेल्या व्यक्ती, कुटुंबातील सदस्य, सोसायटीतील सदस्य, कामवाली, आदींची तपासणी करण्यात आली. रुग्णाच्या संपर्कातील ४२ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ओमायक्रॉनचा शहरात शिरकाव झाला असला तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मात्र, मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग असे कोरोना प्रतिबंधक नियम आवर्जून पालन करावे, असे पुणे महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details