महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुणे जिल्ह्यात कोरोनाचा आकडा 2657 तर 827 कोरोनाबाधित रुग्ण बरे, विभागाचा आकडा 3023वर - पुणे कोरोना अपडेट

पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात भर पडत आहे. ही संख्या 2657 झाली असून ८२७ रुग्ण बरे झाले आहेत तर 146 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Corona positive patients
पुणे जिल्हयात कोरोनाचा आकडा 2657

By

Published : May 9, 2020, 7:20 PM IST

पुणे - पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2657 झाली आहे. 827 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अ‌ॅक्टिव्ह रुग्ण संख्या 1684 आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित एकूण 146 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 85 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.

विभागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3023 झाली आहे. विभागातील 912 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अ‌ॅक्टिव्ह रुग्ण संख्या 1948 आहे. विभागात कोरोनाबाधित एकूण 163 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 92 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. या पैकी पुणे जिल्ह्यात 2657 एकूण बाधित रुग्ण संख्या आहे, तर 827 रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला असून जिल्ह्यातल्या मृतांचा आकडा 146 झाला आहे.

सातारा जिल्ह्यात एकूण बाधितांचा आकडा 115 आहे तर आतापर्यंत 20 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे....सोलापूर जिल्ह्यात 193 बाधित, 13 मृत्यू आणि 29 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे...सांगलीमध्ये एकूण बाधित 37, 1 मृत्यू आणि 27 डिस्चार्ज आणि कोल्हापूर जिल्ह्यात 18 एकूण बाधित 9 डिस्चार्ज आणि 1 मृत्यू झाला आहे. आतापर्यंत विभागामध्ये एकूण 30618 नमुने तपासणीसाठी पाठविणेत आले होते. त्यापैकी 29610चा अहवाल प्राप्त आहे. 1374 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.

प्राप्त अहवालांपैकी 26244 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह असन 3023चा अहवाल पॉझिटिव्ह आहे. आजपर्यंत विभागामधील 8849655 घरांचे सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 38147952 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 2159 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details