पुणे - नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कोरोनाने पुन्हा एकदा धुमाकूळ ( Pune Corona Patient Numbers Increased ) घालायला सुरवात केली आहे. चिंता वाढवणारी बाब म्हणजे पुण्यात ओमायक्रॉन व्हेरियंटचा ( Omicron In Maharashtra ) उद्रेक झाला आहे. मुंबई पाठोपाठ पुण्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पुण्यात आज दिवसभरात 524 नवे कोरोना रुग्ण ( Pune Todays Corona Patient numbers ) आढळले असून यात ओमायक्रॉन व्हेरियंटची ( Pune Omicron Patient Numbers ) लागण झालेले 36 रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे.
शहरात दिवसंदिवस वाढत आहे रुग्णसंख्या -
शहरात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण कमी झाले होते. दरोरोज 100च्या पटीत रुग्ण आढळून येत होते. मात्र, वाढत जाणारी गर्दी, नागरिकांकडून होणार नियमांचे उल्लंघन यामुळे शहरात आत्ता रुग्णसंख्या वाढायला लागली आहे. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून हा आकडा वाढला असून शहरात 400 आणि 500 रुग्ण आढळून येत आहेत. एकीकडे राज्यात ओमायक्रॉनचा धोका तर दुसरीकडे दिवसंदिवस वाढत जाणाऱ्या रुग्णसंख्येमुळे चिंतेच वातावरण निर्माण झाला आहे.