महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुणे शहरात कोरोना संसर्गाचा वेग वाढला; सर्वाधिक नवे रुग्ण मार्च महिन्यात - राज्यात कोरोनाची दुसरी लाट

पुणे जिल्ह्याचा विचार केला तर सरासरी 3 हजारपेक्षा जास्त रुग्ण दररोज वाढत आहेत. पुणे शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर गेल्या एक वर्षात एका दिवसात सर्वाधिक रुग्ण हे 19 मार्च 2021 ला 2854 इतके सापडले आहेत. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणदेखील वाढले आहे.

By

Published : Mar 20, 2021, 5:33 PM IST

पुणे- राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असल्याचे सांगितले जाते आहे. कोरोना संसर्गाचा वेग फेब्रुवारीच्या मध्यानंतर वाढला आणि राज्यात सर्वच भागात कोरोना वाढत असताना पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू झाल्याचे चित्र आहे. पुणे शहराचा विचार केला तर गेल्या दहा दिवसात शहरात दररोज सरासरी दीड ते दोन हजार रुग्ण वाढत आहेत. पुणे जिल्ह्याचा विचार केला तर सरासरी 3 हजारपेक्षा जास्त रुग्ण दररोज वाढत आहेत. पुणे शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर गेल्या एक वर्षात एका दिवसात सर्वाधिक रुग्ण हे 19 मार्च 2021 ला 2854 इतके सापडले आहेत. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणदेखील वाढले आहे. पुणे जिल्ह्याचा विचार केला तर पुणे जिल्ह्यात गेल्या दहा दिवसात सरासरी दररोज 3 हजार नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. तर दहा दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील अ‌ॅक्टिव्ह रुग्णसंख्या 14 हजार 441 होती ती दहा दिवसांमध्ये 30 हजार 52 इतकी झाली असून दहा दिवसातच जिल्ह्यातील रुग्ण दुप्पट झाले आहेत.

पुणे
पुणे शहर आणि जिल्ह्याची 10 दिवसातील आकडेवारी
१० मार्च -- १३५२ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.मृत्यू - १३ रुग्णांचा मृत्यू , ०६ रुग्ण पुण्याबाहेरील. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ७७१९.
११ मार्च-- १५०४ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.मृत्यू -- १३ रुग्णांचा मृत्यू. ०६ रुग्ण पुण्याबाहेरील.-
१२ मार्च-- १८०५ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.मृत्यू -- १३ रुग्णांचा मृत्यू. ०५ रुग्ण पुण्याबाहेरील.
१३ मार्च-- १६३३ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.मृत्यू -- १३ रुग्णांचा मृत्यू. ०१ रुग्ण पुण्याबाहेरील.
१४ मार्च-- १७४० पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.मृत्यू-- १७ रुग्णांचा मृत्यू, ०२ रुग्ण पुण्याबाहेरील.
१५ मार्च-- १०८२ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.मृत्यू -- ११ रुग्णांचा मृत्यू. ०१ रुग्ण पुण्याबाहेरील.
१६ मार्च -- १९२५ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.मृत्यू -- ०९ रुग्णांचा मृत्यू. ०२ रुग्ण पुण्याबाहेरील.
१७ मार्च -- २५८७ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.मृत्यू -- १६ रुग्णांचा मृत्यू. ०५ रुग्ण पुण्याबाहेरील.
१८ मार्च -- २७५२ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.मृत्यू -- २८ रुग्णांचा मृत्यू. ०६ रुग्ण पुण्याबाहेरील.
१९ मार्च -- २८३४ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.मृत्यू -- २८ रुग्णांचा मृत्यू , १३ रुग्ण पुण्याबाहेरील.
पुणे जिल्हा -


11 मार्च-- 2384 नवे पॉझिटिव्ह..
ऍक्टिव्ह रुग्ण 14हजार 441

12 मार्च -- 3166 नवे पॉझिटिव्ह
ऍक्टिव्ह रुग्ण -- 17हजार132

13 मार्च -- 3184 नवे पॉझिटिव्ह
ऍक्टिव्ह रुग्ण -- 18हजार 615

14 मार्च -- 3446नवे पॉझिटिव्ह
ऍक्टिव्ह रुग्ण -- 20हजार241

15मार्च--3643नवे पॉझिटिव्ह
ऍक्टिव्ह रुग्ण --21हजार653

16मार्च--2622नवे पॉझिटिव्ह
ऍक्टिव्ह रुग्ण -- 22हजार142

17मार्च--4हजार101नवे पॉझिटिव्ह
ऍक्टिव्ह रुग्ण -- 24हजार127

18मार्च--5हजार412 पॉझिटिव्ह
ऍक्टिव्ह रुग्ण -- 26हजार884नवे

19मार्च--4हजार965नवे पॉझिटिव्ह
ऍक्टिव्ह रुग्ण -- 30हजार52

राज्यातील एक आघाडीचे शहर तसेच आयटी क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर हे देशात दुसऱ्या क्रमांकाचे राहण्यायोग्य शहर असताना पुण्यात कोरोनाचा इतका फैलाव का होतो? यावर चर्चा सुरू आहे. मार्च 2020 ला पुणे शहरात कोरोनाचा राज्यातील पहिला रुग्ण सापडला होता आणि त्यानंतर झपाट्याने रुग्णसंख्या वाढत होती. गेल्या वर्षी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक पुण्यात पहायला मिळाला. या काळात पुणे शहरात एका दिवसात आढळणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांचा आकडा हा 16 सप्टेंबर 2020 ला 2 हजार 120 इतका आढळून आला होता. त्यानंतर कडक टाळेबंदीमुळे दरदिवशी सापडणाऱ्या रुग्णांची संख्या हळूहळू कमी कमी होत गेली आणि 2021 जानेवारीच्या सुरुवातीला दररोज आढळणाऱ्या रुग्णांचा आकडा 100 च्या आत आला होता, त्यानंतर मात्र शिथील झालेली टाळेबंदी, सार्वजनिक कार्यक्रमांची वाढलेली संख्या, यामुळे सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची होणारी गर्दी यामुळे पुन्हा फेब्रुवारीपासून रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. या सगळ्या परिस्थितीचा विचार करून महापालिकेकडून उपाययोजना करण्यात येत असल्याचे पुण्याचे महापौर सांगतात. गरज पडल्यास कोरोना केंद्रे पुन्हा सुरू केली जातील, असे महापौर सांगतात.

तसेच सध्या 80 टक्के रुग्ण हे गृह अलगीकरणामध्ये असल्याचे महापौर सांगतात. पुणे शहरात अचानक आलेल्या या कोरोना उद्रेकाच्या नेमक्या कारणांचा विचार केला जात आहे. यामध्ये जे रुग्ण गृह अलगीकरणात आहेत ते विलगीकरण पाळतात का? हा प्रश्न आहे. मात्र महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. आशिष भारती यांच्या म्हणण्यानुसार गृह अलगीकरणातील रुग्णांवर महापालिका लक्ष ठेवून आहे. अशा रुग्णांच्या घरावर त्यांच्याबाबत माहिती देणारे स्टिकर महापालिकेने लावले असल्याचे ते सांगतात, तसेच सध्या कोरोनाचा प्रसार वेगाने होत असला तरी त्याची धोक्याची तीव्रता कमी आल्याचे डॉ भारती सांगतात. दुसरीकडे भारतीय वैद्यकीय संघटना महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी महाराष्ट्रात नवा परावर्तित झालेला कोरोना विषाणू असावा, अशी शक्यता व्यक्त केली आहे. कोरोना विषाणू परावर्तित होत आहे आणि हा परावर्तित विषाणू अधिक वेगाने फैलावत असणारा असल्याने रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असावी असे त्यांना वाटते.

ABOUT THE AUTHOR

...view details