महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुणे : 185 पोलिसांना कोरोनाची लागण.. 24 तासात 60 पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह - पुणे कोरोना अपडेट

शहरातील कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. रस्त्यावर तसेच विविध बंदोबस्तात सहभागी होणारे पोलीसही कोरोनाबाधित होऊ लागले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत आतापर्यंत शहर पोलीस दलातील 185 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

policemen corona infection
policemen corona infection

By

Published : Jan 8, 2022, 10:05 PM IST

पुणे - शहरातील कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. रस्त्यावर तसेच विविध बंदोबस्तात सहभागी होणारे पोलीसही कोरोनाबाधित होऊ लागले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत आतापर्यंत शहर पोलीस दलातील 185 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

मागील 24 तासात 60 पोलिसांना कोरोनाची लागण -
शहरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या 3 तीन दिवसांपासून तर कोरोना रुग्णांचा आकडा हा 2 हजारांच्या वर वाढत आहे. अशातच बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना देखील कोरोनाची लागण होत असून मागील 24 तासात शहरातील 60 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. एकूण 185 बधितांमध्ये 27 अधिकारीवर्ग तर 158 हे कर्मचारी बाधित झाले आहेत.

शहरात एकूण 11550 अॅक्टिव्ह रुग्ण -
शहरात वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे शहरातील आत्तापर्यंत ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ही 11,550 एवढी झाली आहे.तर आज शहरात 2471 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details