पुणे- कोरोना काळात अनेकांना अनेक समस्येला सामोरे जावे लागले. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात कोरोना बधितांचा मृत्यू ( corona impact on family ) झाल्याचे पाहायला मिळाले. शहरात कोरोनाने आजतागायत एकूण 9,124 मृत्यू ( 9124 corona deaths in Pune ) झाले आहेत. कोरोना काळात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील व्यथा ( Punes family suffered in pandemic ) ईटीव्ही भारतने जाणून घेतली आहे.
असे झाले बाळासाहेब आणि कल्पना बाधित-
गेल्या तीन पिढ्यापासूनआहेर कुटुंब पुण्यातील खडकी येथे राहत आहे. बाळासाहेब आहेर हे सदाशिव पेठेत कार्पेटच व्यवसाय करत ( Balasaheb Aher family story ) असतात. त्यांची बायको कल्पना आहेर आणि दोन मुले असा सुखी परिवार गेल्या अनेक वर्षांपासून हसत खेळत राहत होता. पण, कोरोनाची लाट आल्यानंतर सर्वकाही बंद ( Punes family suffered in pandemic ) झाले. लॉकडाऊन लागले तेव्हा सर्वांप्रमाणे हे कुटुंबदेखील घरीच आपल्यासह आपल्या कुटुंबियांची काळजी घेत जगत होते.
हेही वाचा-Iqbal Singh Chahal On Mumbai Corona : एकही डोस न घेतलेले रुग्ण ऑक्सिजन बेडवर - आयुक्त चहल
पहिली लाट ओसरल्यानंतर हळूहळू सर्वकाही पूर्वपदावर येत होता. डेल्टा विषाणूचा नवा व्हेरियट आला. त्यानंतर दुसऱ्या लाटेला सुरवात झाली. अशातच घरात असलेल्या या आहेर कुटुंबातील बाळासाहेब आहेर आणि त्यांच्या बायकोला 5 एप्रिलला कोरोनाची लागण झाली. त्यांनी नजीकच्या खडकीतील कॅन्टोन्मेंट रुग्णालयात उपचार सुरू केले. दिवसंदिवस बाळासाहेब यांची प्रकृतीत सुधारणा होत असताना त्यांची बायको कल्पना आहेर यांची प्रकृती ही बिघडतच चालली होती. ऑक्सिजन पातळी ही दिवसेंदिवस कमी होत चालली होती. बाळासाहेब यांना डिस्चार्जही मिळाला. पण अचानक 27 एप्रिलला कल्पना यांचे निधन झाले. या सर्वकाळात दोन्ही मुलांनी खूप धावपळ केली. पण शेवटी कल्पनाचा जीव वाचवू शकलो नाही, असे यावेळी बाळासाहेब वसंत आहेर यांनी सांगितले.