महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यपालांच्या ऑनलाइन उपस्थितीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११७ वा दीक्षांत समारोह संपन्न - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११७ वा दीक्षांत समारोह

राज्यपालांच्या ऑनलाइन उपस्थितीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११७ वा दीक्षांत समारोह पार पडला. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

convocation ceremony of savitribai phule pune university
राज्यपालांच्या ऑनलाइन उपस्थितीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११७ वा दीक्षांत समारोह संपन्न

By

Published : Sep 11, 2020, 9:17 AM IST

मुंबई/पुणे - कोरोना महामारीकडे आव्हान म्हणून न पाहता देशासाठी सेवा करण्याची संधी आहे, असे मानून युवकांनी साहसी होऊन समर्पण भावनेने देशासाठी कार्य करावे, अशी सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्नातक विद्यार्थ्यांना केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११७ वा दीक्षांत समारोह ऑनलाइन पार पडला. या कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यपाल कोश्यारी यांनी उपस्थितांशी संवाद साधला. उद्योगपती डॉ. नौशाद फोर्ब्स या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

राज्यपालांच्या ऑनलाइन उपस्थितीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११७ वा दीक्षांत समारोह संपन्न
महात्मा फुले, सावित्रीबाई फुले तसेच लोकमान्य टिळक यांचे आदर्श डोळ्यांपुढे ठेवून कार्य केल्यास तुम्ही देखील आदर्श नागरिक व्हाल, असे राज्यपालांनी यावेळी बोलताना युवकांना सांगितले. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बहुशाखा तसेच आंतरशाखा अध्ययनाला चालना दिली आहे. त्यामुळे विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना बहुशाखा अभ्यास करण्यासाठी प्रेरित करावे, अशीही सूचना राज्यपालांनी यावेळी केली. चीनची अर्थव्यवस्था आणि संरक्षण सिद्धता भारतापेक्षा मोठी असली तरीही विविधतेतून एकता हे आपले बलस्थान असल्याचे कोश्यारी यांनी यावेळी सांगितले.
राज्यपालांच्या ऑनलाइन उपस्थितीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११७ वा दीक्षांत समारोह संपन्न
या दीक्षांत समारोहात ७०३५ पदवी व पदव्युत्तर स्नातक, १३ एमफील तसेच १०४ पीएचडी धारकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु नितीन करमळकर, विद्यापीठांच्या प्राधिकारणांचे सदस्य, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details