पुणे - राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 142 व्या अभ्यासक्रमाचा दीक्षांत समारंभ ( Convocation ceremony of NDA ) हबीबुल्लाह सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत हे ( NDA pune Convocation news ) प्रमुख पाहुणे होते. यावेळी 234 कॅडेट्सना जेएनयूची पदवी प्रदान करण्यात आली. ज्यामध्ये विज्ञान शाखेतील 41 कॅडेट, संगणक विज्ञान शाखेतील 106 कॅडेट आणि कला शाखेतील 68 कॅडेट्सचा समावेश आहे.
पुण्यात राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 142 व्या अभ्यासक्रमाचा दीक्षांत समारंभ संपन्न - NDA pune Convocation news
राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 142 व्या अभ्यासक्रमाचा दीक्षांत समारंभ ( Convocation ceremony of NDA ) हबीबुल्लाह सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत हे ( NDA pune Convocation news ) प्रमुख पाहुणे होते.
कार्यक्रमादरम्यान परदेशातील 19 कॅडेट्सनाही पदवी प्रदान करण्यात आली. याशिवाय, नौदल आणि हवाई दलाच्या 106 कॅडेट्सचा समावेश असलेल्या बी टेक स्ट्रीममध्ये 'तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र' देखील प्राप्त झाले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व्हाइस अॅडमिरल अजय कोचर यांनी केले. स्प्रिंग टर्म - 2022 चा शैक्षणिक अहवाल सादर करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल कॅडेट्सचे अभिनंदन केले. भारतीय सशस्त्र दलाच्या या प्रतिष्ठित ‘ट्राय सर्व्हिसेस’ प्रशिक्षण संस्थेत सामील होण्यासाठी आपल्या मुलांना प्रवृत्त करणाऱ्या सर्व पालकांचे त्यांनी अभिनंदन केले आणि त्यांचे मनापासून आभार मानले
यावेळी पहिल्या चारमध्ये आलेले कॅडेट्स पुढील प्रमाणे आहे -सूरज कुमार याने नालंदा सैनिक स्कुलमधून आपले शैक्षणिक स्तर पूर्ण केले आहे तो आयएमए इन्फन्ट्री जॉईन करणार आहे. दुसरा क्रमांकावर कॅडेट रवी कुमार आहे. तो फतेहाबद हरियाणा येथे राहणारा असून त्याचे वडील लष्करातून निवृत्त आहेत आणि त्यांच्याकडून त्याला प्रेरणा मिळाली. तो आयएमए इन्फन्ट्री जॉईन करणार आहे. तिसरा क्रमांक पटकवलेला शिवम कन्हैय्या हा मुजफ्फरपूर येथील राहणारा असून स्वीमिंग, फ्रेंच भाषा यामध्ये तो पारंगत आहे आणि यानंतर तो आयएमए जॉईन करणार आहे. चौथा क्रमांकावर अनमोल सिंह कोंडल आला आहे. तो हिमाचल प्रदेश, बिलासपूर येथील आहे आणि आपल्या वडिलांकडून त्याला प्रेरणा मिळाली, असे तो सांगतो. तो हैदराबाद येथील फायटर स्ट्रीममध्ये जाणार आहे.
हेही वाचा -B.A. Patients In Pune : चिंता वाढली पुण्यात ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटचे 7 रुग्ण