महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Atul Londhe Criticised on BJP : सामान्यांना तिरंगा फडकवण्याचा अधिकार काँग्रेसने दिला, भाजपने लोकशाहीचा गळा घोटला- अतुल लोंढे - Congress spokesperson Atul Londhe

भारतीय काँग्रेसने 2005 साली सुप्रीम कोर्टातून सामान्य माणसाला तिरंगा फडकवण्याचा अधिकार मिळवून दिला. 2002 सालापर्यंत सर्वसामान्य नागरिकांना तिरंगा फडकावण्याचा ( National Flag ) अधिकार नव्हता. परंतु, 2005 साली काॅंग्रेसने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून हा अधिकार सर्वसामान्यांकरिता खुला करून दिला. त्यामुळे काॅंग्रेससाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ( Azadi Ka Amrit Mahotsav ) रोजच असतो. परंतु भाजप याच गोष्टीचा इव्हेंट करतेय अशी टीका काॅंग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे ( Atul Londhe Criticised on BJP ) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Congress Press Conference
काॅंग्रेस पत्रकार परिषद

By

Published : Aug 7, 2022, 8:09 AM IST

पुणे : सामान्य माणसालासुद्धा तिरंगा ( National Flag ) फडकावण्याचा अधिकार काँग्रेसमुळे मिळालेला आहे. 2002 पर्यंत सामान्य माणसाला तिरंगा ध्वज ( National Flag ) फडकावण्यासाठी बंदी होती. परंतु, 2005 ला काँग्रेसचे नेते हे सुप्रीम कोर्टात गेले आणि सामान्य माणसाच्या मूलभूत अधिकारांमध्ये तिरंगा फडकवण्याचा अधिकार मिळवून दिला. आमच्यासाठी रोजच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ( Azadi Ka Amrit Mahotsav ) असतो. परंतु, भाजपासाठी तो इव्हेंट असतो, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे ( Congress State Spokesperson Atul Londhe ) यांनी पुण्यात भाजप आणि केंद्र सरकारवर केली आहे.

नागरिकांना तिरंगा फडकवण्याचा अधिकार दिला मिळवून : भारतीय काँग्रेसने 2005 साली सुप्रीम कोर्टातून सामान्य माणसाच्या मूलभूत अधिकारांमध्ये तिरंगा फडकवण्याचा अधिकार मिळवून दिला. 2002 सालापर्यंत सर्वसामान्य नागरिकांना तिरंगा फडकावण्याचा अधिकार नव्हता. परंतु, 2005 साली काॅंग्रेस माननीय सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून हा अधिकार सर्वसामान्यांकरिता खुला करून दिला. त्यामुळे काॅंग्रेससाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव रोजच असतो. असे काॅंग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

काॅंग्रेस पत्रकार परिषद

भारतीय काॅंग्रेसने लोकशाहीची मूल्ये रुजवली : भारतीय काँग्रेसचे हे सगळ्यात मोठा यश आहे की, आम्ही लोकांमध्ये लोकशाहीची मूल्ये रुजवली, संविधान रुजवले आणि लोकशाही जिवंत ठेवली. परंतु, आज लोकशाहीच्या गळा घोटला जातोय. गेल्या आठ वर्षांमध्ये देशात हुकूमशाहीचे राज्य आल्यासारखी स्थिती निर्माण झालेली आहे. आदिवासींचे प्रश्न, शेतकऱ्यांचे मोलमजुरांचे प्रश्न, त्यांच्या योजना संकटात आलेल्या आहेत. विरोधकांवर आयकर विभाग, ईडी, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अशा संस्थांचा दबाव आहे आणि यातून लोकशाहीचा गळा घोटला जात आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

काॅंग्रेसकडून अमृत महोत्सवानिमित्त पुण्यात विविध कार्यक्रम : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी आज अतुल लोंढे पुण्यात आले होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून प्रत्येक जिल्ह्यामध्ये 75 किलोमीटरची रॅली काढण्यात येणार आहे. तिरंगा ध्वज घेऊन तसेच सायकल रॅलीचे आयोजन केलेले आहे. स्वतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेसुद्धा 14 तारखेला आगाखान पॅलेस या ठिकाणी अमृत महोत्सवाचा कार्यक्रम करणार आहेत. ज्या ठिकाणी महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सहभागी होणार आहे.


पुण्यातील अगाखान पॅलेसमध्ये कार्यक्रम : काँग्रेसच्या वतीने विविध कार्यक्रम यानिमित्त ठेवण्यात येणार आहेत आणि त्यासाठीच आज अतुल लोंढे पुण्यात आले होते. काँग्रेसतर्फे सायकल रॅलीसुद्धा काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर आगाखान पॅलेसच्या तिथेही काँग्रेसतर्फे 14 ऑगस्टला कार्यक्रम आहे. त्याचबरोबर पुणे कॅम्प आयमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 किलोमीटरची रॅली निघणार आहे.

काॅंग्रेस भवनात काॅंग्रेसच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती : पुण्यामधील काँग्रेस भवन येथे अतुल लोंढे हे पत्रकारांशी संवाद साधत होते. या पत्रकार परिषदेला आमदार संग्राम थोपटे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांसह जिल्ह्यातील सर्व काँग्रेसचे पदाधिकारी पिंपरी चिंचवडचे पदाधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर पुणे शहरातील काॅंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. पुण्यातील काॅंग्रेसचे सर्व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा : Kedar Dighe Granted Pre Arrest Bail : केदार दिघे यांना बलात्कार पीडित महिलेला धमकावल्याप्रकरणी अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर

ABOUT THE AUTHOR

...view details