महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नामुळे भाजपला पोटदुखी' - काँग्रेस प्रवक्ते सचिन सावं ऑन भाजप

मोदी सरकारला मराठा आरक्षणाच्या प्रश्नाविषयी कुठलीही आस्था नाही. ते याबाबत अनुकूल नाहीत, हे यातून स्पष्ट होत असल्याचे सचिन सावंत म्हणाले.

sachin sawant
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत

By

Published : Oct 28, 2020, 7:06 PM IST

पुणे - मराठा आरक्षण विषयावर राज्य सरकार प्रामाणिक प्रयत्न करत आहे. मात्र, राज्य सरकारच्या या प्रामाणिक प्रयत्नांची पोटदुखी भाजपला झाली आहे. भाजपकडून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अपप्रचार केला जात आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते.

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत

राज्य सरकारला बदनाम करण्याचा भाजपचा प्रयत्न

राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. भाजपमधील मराठा समाजाच्या नेत्यांमध्ये एकमत नाही. तसेच मराठा आरक्षण विषयावर केंद्र सरकार कुठलीच भूमिका घेत नाही. तसेच आरक्षणावर काहीही बोलायला तयार नाही. मराठा आरक्षणावर मोदी सरकारची नेमकी भूमिका काय हेच समजत नसल्याचे सचिन सावंत म्हणाले.

मराठा आरक्षणावर मोदी सरकारची भूमिका काय?

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तीन पत्र पाठवले आहेत. त्याचे उत्तर देखील त्यांनी दिलेले नाही. मोदी सरकारला मराठा आरक्षणाच्या प्रश्नाविषयी कुठलीही आस्था नाही. ते याबाबत अनुकूल नाहीत, हे यातून स्पष्ट होत असल्याचे सचिन सावंत म्हणाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष तसेच इतर नेते मराठा आरक्षणावरून राज्य सरकारवर टीका करतात. मात्र, राज्य सरकारने लवकरात लवकर घटना पीठाची नियुक्ती करण्यात यावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला आहे. आणखी काय करायला हवे होते असा प्रश्न सचिन सावंत यांनी विचारला आहे.

भाजपच्या नेत्यांनी आग लावायचे धंदे करू नये - सावंत

भाजपच्या नेत्यांनी आग लावायचे धंदे आता बंद करावेत. गेली पाच वर्ष तुम्ही खोटं बोलत होतात, असा टोला सचिन सावंत यांनी भाजपला लगावला आहे. दरम्यान, राज्यपाल नियुक्त सभासदविषयी विचारले असता, मला याबाबत काही माहिती नाही. पक्षाचे अध्यक्ष जे ठरवतील ते लवकरच कळेल, माझ्याबाबतीत सांगायचे तर मला जी जबाबदारी पक्ष देईल ती मी प्रामाणिकपणे पार पाडतो, असे सचिन सावंत यावेळी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details