पुणे - स्वारगेट येथील उड्डाण पुलाला पूर्वी देशभक्त कै. केशवराज जेधे यांचे नाव होते. मात्र, भाजपा आमदार माधुरी मिसाळ यांनी या ठिकाणी नवीन बोर्ड लावला आहे. त्यामध्ये देशभक्त उल्लेख काढून कै. केशवराज जेधे उड्डाणपूल असे नाव आणि फलक लावण्यात आल आहे. याच्या निषेधार्थ पुणे शहर काँग्रेसकडून जेधे चौकात आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी या आंदोलनात देशभक्त केशवराज जेधेंचे वंशज संताजी जेधे हे देखील सहभाग होते. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपाने लावलेल्या बोर्डवर सुधारित बॅनर लावून घोषणाबाजी केली.
जुना बोर्ड जसा होता तसाच बसवा - देशभक्त केशवराव जेधे यांना जेव्हा 125 वर्ष पूर्ण झाली तेव्हा जुना बोर्ड काढून नवीन बोर्ड बसवण्यात आला. तेव्हा मी आमदार माधुरी मिसाळ यांना सांगितले की जुना बोर्ड जसा होता तसाच बसवा. पण ते म्हटले की, हा एलईडी बोर्ड आहे. आणि मी तुमच्या आजोबाचा बोर्ड लावला आहे. यात तुम्ही भूषण समजा नाही तर मी माझ्या आजोबांचे नावही दिले असते अशी भाषा माझ्या बरोबर केली आणि मग मी याची तक्रार खासदार गिरीश बापट यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली, अशी माहिती यावेळी देशभक्त केशवराज जेधेंचे वंशज संताजी जेधे यांनी दिली आहे.