महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Congress Protest in Pune : पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्याविरोधात काँग्रेस पक्षाचं आंदोलन - पुण्यात कॉंग्रेसचे आंदोलन

पुण्यातील आंदोलनादरम्यान ( Congress Protest in Pune ) काँग्रेस कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी अशी मागणी केली. कोरोना काँग्रेसमुळे नाही तर पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या नमस्ते ट्रंप या कार्यक्रमामुळे देशभर पसरल्याचा आरोप केला आहे.

Congress Protest in Pune
Congress Protest in Pune

By

Published : Feb 10, 2022, 5:09 PM IST

पुणे -पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Speech) यांनी लोकसभेत केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस आता अधिकच आक्रमक झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेत खोट बोलत असल्याचा आरोप करत राज्यभरातील काँग्रेसचे कार्यकर्ते हे ( Congress Protest in Pune ) रस्त्यावर उतरताना दिसत आहेत. पुण्यातही मोदींच्या विरोधात काँग्रेसेने भाजप कार्यालयासमोर आंदोलन केलेलं पाहायला मिळालं.

काँग्रेस पक्षाचं आंदोलन
आपल्या लोकसभेतील भाषणाच्या वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना काळात काँग्रेसने हद्दच केल्याचे सांगताच महाराष्ट्र काँग्रेसने देशभर कोरोना पसरवल्याचे विधान केलं होत. त्यांच्या याच वक्तव्यावरून काँग्रेस देशभर आक्रमक झाली आहे. नरेंद्र मोदी संसदेत खोट बोलत आहेत असा आरोप काँग्रेस कार्यकर्ते करत आहेत.

नमस्ते ट्रंप कार्यक्रम
या आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी अशी मागणी केली. कोरोना काँग्रेसमुळे नाही तर पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या नमस्ते ट्रंप या कार्यक्रमामुळे देशभर पसरल्याचा आरोप केला आहे. मोदी यांनी महाराष्ट्राची बदनामी केली त्यासाठी माफीची मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

काँग्रेस विरोधात भाजपही रस्त्यावर
एकीकडे काँग्रेस आंदोलन करत असतानाच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी देखील आंदोलन करत काँगेसच्या या आंदोलनाला प्रतिउत्तर दिलं आहे. तुम्ही मोदींना माफी मागायला सांगत आहेत. काँग्रेसला लाज वाटली पाहिजे अशा शब्दात भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसला उत्तर दिलं आहे. काँग्रेसने ७० वर्षांत अनेक घोटाळे केले. त्यावेळी त्यांना लाज वाटली नाही का आणि नरेंद्र मोदी जे बोलतात ते पुराव्यानिशी बोलतात असे सांगत पंतप्रधानाच्या त्या वक्तव्याच समर्थन भाजप कार्यकर्त्यांनी केलं आहे.
हेही वाचा -मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या पुलासाठी नागरिक आक्रमक ; आंदोलकांचा पुलावर चढून जलसमाधीचा पवित्रा

ABOUT THE AUTHOR

...view details