मुंबई - भाजप नेते किरीट सोमै्या हे मागील आठवड्यात पुणे महापालिकेत आले असता शिवसैनिकांनी आंदोलन केले होते. या आंदोलनात किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की देखील करण्यात आली होती. ज्यामध्ये ते जखमी झाले होते. एवढेच नाही तर भाजप नेते किरीट सोमय्या हे या धककबुक्कीत महापालिकेच्या पायऱ्यांवरती पडले देखील होते. (Kirit Somaiya In Pune) दरम्यान, आज किरीट सोमय्या पुन्हा पुणे महापालिकेत येणार आहेत (Congress opposes Kirit Somaiya) आणि या साऱ्या घटनेमुळे महापालिकेत भाजपच्या वतीने सोमय्या यांचा सत्कार करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी शिवसैनिकांनी सोमय्या यांना अडवले होते त्या ठिकाणी हा सत्कार केला जाणार आहे.
किरीट सोमय्या यांचा भाजपतर्फे सत्कार
किरीट सोमय्या यांच्या आजच्या पुणे दौऱ्या दरम्यान ते ४ वाजता पुणे महापालिकेत येणार आहेत.पुणे महापालिकेतील पायऱ्यांवर भाजपतर्फे त्यांचा सत्कार देखील केला जाणार आहे. (Attack on Kirit Somaiya) मात्र काँग्रेसने याला विरोध केला आहे. दरम्यान, काँग्रेसने मात्र या सत्काराच्या कार्यक्रमाला विरोध केला आहे. त्या कार्यक्रमाला महापालिकेने परवानगी दिल्यास त्या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शहराध्यक्ष रमेश बागवे आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी पत्राद्वारे महापालिका आयुक्तांना दिला आहे.