पिंपरी चिंचवड (पुणे) -उत्तर प्रदेश येथील हाथसर येथे झालेल्या बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबाला भेटायला जाताना राहुल गांधी यांना पोलिसांद्वारे धक्काबुक्की करण्यात आली. त्याचे पडसाद आज रात्री उशिरा पिंपरी-चिंचवड शहरात उमटले. यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत घोषणाबाजी केली.
पिंपरी चिंचवडमध्ये कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक; योगी आदित्यनाथ यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन - पुणे ताज्या बातम्या
काँग्रेस नेते राहून गांधी आणि प्रियंका गांधी हे पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी जात होते. तेव्हा, तेथील पोलिसांनी राहुल गांधी यांची अडवणूक करून धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. या घटनेमुळे महाराष्ट्रासह देशभरात काँग्रेस कार्यकर्ते पेटून उठले असून आक्रमक कार्यकर्त्यांनी पिंपरी-चिंचवड शहरात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.
उत्तर प्रदेशमधील हाथसर येथे एका 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची गंभीर घटना घडली होती. तसेच पीडित तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेचे अवघ्या देशात पडसाद उमटले असून योगी आदित्यनाथ यांच्या सरकार विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी जात होते. तेव्हा, तेथील पोलिसांनी राहुल गांधी यांची अडवणूक करून धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. या घटनेमुळे महाराष्ट्रासह देशभरात काँग्रेस कार्यकर्ते पेटून उठले असून आक्रमक कार्यकर्त्यांनी पिंपरी-चिंचवड शहरात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले आहे. यावेळी काँग्रेसचे मनोज कांबळे, कैलास कदम, अशोक मोरे, नरेंद्र बनसोडे, हिरा जाधव, नाशीर चौधरी, उमेश बनसोडे, सचिन शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.