पुणे- वर्षभर वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये लहान मुले भाग घेतात. उन्हाळ्यात शाळांना सुट्ट्या असताना लहान मुलांनी आंबे खाण्याच्या आगळ्यावेगळ्या स्पर्धेत भाग घेतला. ही स्पर्धा पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुलांनी आंब्यावर ताव मारण्याचा मनमुराद आनंद घेतला.
पुण्यात दोन मिनिटांत तीन आंबे खाण्याची स्पर्धा; लहान मुलांनी घेतला मनसोक्त आनंद - महाराष्ट्र माझा
थेट शेतकऱ्यांपासून ग्राहकांपर्यत आंबा पोहोचविणाऱ्या 'महाराष्ट्र माझा आंबा' महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. त्यानिमित्ताने खास लहान मुलांसाठी आंबा खाण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेचे पुण्यातील महाराष्ट्र माझा या संस्थेच्यावतीने आयोजन करण्यात आले.
यंदा आंब्यांची आवक कमी असल्याने बाजारात भाव तेजीत आहे. त्यामुळे थेट शेतकऱ्यांपासून ग्राहकांपर्यत आंबा पोहोचविणाऱ्या 'महाराष्ट्र माझा आंबा' महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. त्यानिमित्ताने खास लहान मुलांसाठी आंबा खाण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेचे पुण्यातील महाराष्ट्र माझा या संस्थेच्यावतीने आयोजन करण्यात आले.
अशी होती स्पर्धा-
स्पर्धेत दोन मिनिटांत तीन आंबे खाण्याची शर्यत लावण्यात आली होती. यामध्ये पाच ते दहा वयोगटातील मुलांनी आंबे खाण्याचा मनसोक्त आनंद घेतला. फळांचा राजा म्हणून ओळख असलेला आंबा लहानांनादेखील चाखता यावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावेळी लहान मुलांनी हापूस आंब्यांवरही ताव मारला. यावेळी, आंबे खावून मुलांचे चेहरे पिवळे जर्द झाल्याचे दिसत होते. लहान मुलांसाठी असलेल्या आंबे खाण्याच्या स्पर्धेचे हे यंदाचे दहावे वर्ष आहे.