पुणे - पुण्यातील येरवड्यामधील शास्त्रीनगर परिसरात गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास एका इमारतीचा स्लॅब कोसळून पाच कामगारांचा मृत्यू झाला ( Pune Building Slab Collapse ) आहे. येथील वाडिया बंगल्याजवळ इमारतीच्या स्लॅबची जाळी कोसळून पाच कामागारांचा जागीच मृत्यू ( Pune Slab Collapse Five Death ) झाला. तर अन्य काही कामगार जखमी झाले आहेत. या घटनेबाबत तज्ञ लोकांची समिती नेमली असून, अहवाल आल्यानंतर संबंधित व्यक्तीवर कारवाई केली जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम यांनी ( Commissioner Vikram Kumar On Slab Collapse ) दिली.
आयुक्त विक्रम कुमार ( Commissioner Vikram Kumar ) यांनी स्लॅब कोसळल्याच्या परिसराची पाहणी केली. जी घटना घडलेली ती दुर्दैवी आहे. ही घटना कशी घडली याबाबत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सीओईपी महाविद्यालयातील तज्ञ लोकांची समिती नेमली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असेही विक्रम कुमार यांनी सांगितले.